Anant Radhika Pre Wedding : ‘व्हीआयपी’ मंडळींची वर्दळ अन् ‘जामनगर’ बनलं आंतरराष्ट्रीय विमानतळ

Anant Radhika Pre Wedding : ‘व्हीआयपी’ मंडळींची वर्दळ अन् ‘जामनगर’ बनलं आंतरराष्ट्रीय विमानतळ

Anant Radhika Pre Wedding Event in Jamnagar : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट (Anant Radhika Pre Wedding Event) यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देश विदेशातील सेलिब्रेटिंच आगमन होत आहे. त्यामुळे जामनगरच्या देशांतर्गत विमानतळाला दहा दिवसांसाठी  (Jamnagar Airport)आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्यात आले आहे. अपवादात्मक परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आला असला तरी दहा दिवसांसाठी जामनगरचं विमानतळ जागतिक विमानतळ म्हणून ओळखलं जाणार आहे. प्री वेडिंगमधील सुपर व्हिआयपी मुव्हमेंट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, कतारचे पंतप्रधान आणि भूतानचे राजेही या सोहळ्याला हजेरी लावू शकतात. फेसबूकचा मालक मार्क झुकरबर्ग कालच पत्नीसह येथे दाखल झाला आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या कुटुंबियांसह येथे हजर आहे. या गोष्टींचा विचार करून जामनगर विमानतळाला तात्पुरत्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे.

Anant Ambani Radhika Merchant: अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं खास बर्थडे सेलिब्रेशन

या निर्णयानुसार येत्या 6 मार्चपर्यंत या विमानतळांवर दुसऱ्या देशांतून येणाऱ्या विमानांना थांबा मिळणार आहे. प्रोटोकॉलनुसार कस्टम, इमिग्रेशन आणि अन्य औपचारिकता पूर्ण करण्यासाठी येथे कर्मचारी तैनात आहेत. यासाठी अनेक मंत्रालयांची मंजुरी घेण्यात आली आहे. दररोजी 12 त 18 विमानांची ये जा सुरू असून आता यामध्ये वाढ झाली आहे. दररोज साधारण 40 ते 150 उड्डाणे होत आहेत,अशी माहिती मिळाली. उड्डाण हालचाली हाताळण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे.

या विमानतळावर फक्त सहा विमाने उभी करण्यासाठी जागा आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या चार्टर्ड प्लेनसाठी पार्किंग नसल्यामुळे बडोदा, राजकोट, पोरबंदर आणि अहमदाबादसह अन्य विमानतळांवर जागा आरक्षित करण्यात आली आहे. पाहुण्यांना सोडल्यानंतर येथे येणारी व्हिआयपी उड्डाणे टेक ऑफ होतील. जामनगरमध्ये फ्लाइट पार्क नसेल. सर्व विमाने जवळच्या अन्य विमानतळांवर जातील. येथे एअर अॅम्ब्यूलन्ससाठीही जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा चिरंजीव अर्थात अनंत अंबानी 28 वर्षांचा झाला आहे. 10 एप्रिल 2023 रोजी दुबईमध्ये त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचे नियोजन करण्यात आले होते. अनंत अंबानीने राधिका मर्चंटबरोबर दुबईमध्ये त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनंत अंबानीच्या वाढदिवसाचे दुबईमध्ये मोठं सेलिब्रेशन करण्यात आले होते. यानंतर आता या दोघांचे प्री वेडिंग सेलिब्रेशन जामनगरमध्ये होत आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातील सेलिब्रिटीज जामनगरमध्ये येत आहेत.

RIL AGM 2023: ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांची RIL बोर्डावर नियुक्ती, नीता अंबानी बाहेर 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज