PM Modi : “काँग्रेसअंतर्गत कलह, खोटे आरोप करणे हाच त्यांचा अजेंडा”; PM मोदींचा घणाघात

PM Modi : “काँग्रेसअंतर्गत कलह, खोटे आरोप करणे हाच त्यांचा अजेंडा”; PM मोदींचा घणाघात

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या (Lok Sabha Election) राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. पीएम मोदींनी भाजपाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आमच्या विरोधी पक्षांना योजना कशा पूर्ण करायच्या याची माहिती नाही. पण खोटी आश्वासनांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. आज हे सर्व पक्ष आश्वासने द्यायला घाबरत आहेत. आपण देशाला विकसित करू शकत नाही हे या लोकांनी आता मान्य केले आहे. केवळ भाजप आणि एनडीए आघाडीने स्वप्न पाहिले आहे. तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. हीच मोदींची गॅरंटी आहे.

आज विरोधी पक्षही एनडीए 400 पार करेल असे म्हणत आहे. सध्या काँग्रेसमध्ये पीएम मोदींवर वैयक्तिक टीका करायची की नाही याचा संघर्ष सुरू आहे. पक्षातील एका वर्गाचे म्हणणे आहे की मोदींवर वैयक्तिक टीका केल्याने पक्षाचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे एक वर्ग मात्र माझ्यावर वैयक्तिक टीका करत असतो. माझी प्रतिमा खराब करण्याचा डाव या लोकांचा आहे. काँग्रेस घराणेच भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाची जननी आहे.

PM Modi : 17 व्या लोकसभेला मोदींचे अखेरचे भावनिक संबोधन, कृतज्ञता व्यक्त करत मानले सर्वांचे आभार

मी आज तुम्हाला विकसित भारताचे वचन देत आहे. भारतात कोणताही विरोधी पक्ष हे वचन तुम्हाला देऊ शकत नाही. आम्ही 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने काम करत आहोत. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प आम्ही केला आहे.

मोदी म्हणाले, शतकानुशतके प्रलंबित असणारे काम आम्ही पूर्ण करून दाखवले. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले. सात दशकांच्या प्रतिक्षेनंतर जम्मू काश्मीरला कलम 370 च्या जोखडातून मुक्त केले. मागील दहा वर्षे धाडसी निर्णय आणि भविष्यवादी धोरणे यांचे वैशिष्ट्य आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असणारी कामे पूर्ण करण्याची हिंमत आमच्यात आहे. भारतीय नागरिकही दीर्घकाळापासून या बदलांची वाट पाहत होते.

PM Modi Speech : खर्गेचं भाषण ऐकून मनोरंजन झालं, पंतप्रधान मोदींचा खोचक टोला

आम्ही आमची राजकीय व्यवस्था नवीन आणि आधुनिक विचारांसाठी खुली ठेवली आहे. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर वर्षानुवर्षे या देशावर राज्य केले त्यांनी देशात अशी व्यवस्था निर्माण केली होती की केवळ काही मोठ्या लोकच कायम सत्तेत होते. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना महत्वाच्या पदांवर ठेवण्यात आले. पण आता आम्ही ही व्यवस्था बदलून टाकली आहे. आम्ही नवीन लोकांनाही संधी दिली. आमच्या मंत्रिमंडळात ईशान्य भारतातील मंत्री मोठ्या संख्येने आहेत.

आता तरुणांच्या उर्जेने भरलेला भारत स्वतःसाठी ध्येय निश्चित करत आहे. निश्चित केलेले ध्येय साध्यही करत आहे. आम्ही 2029 मध्ये भारतात युवा ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहोत आणि 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याच्या दिशेने काम करत आहोत, असेही मोदी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज