Download App

Dhanush: वाढलेली दाढी, केस अन् डोळ्यांवर गॉगल; धनुषच्या नव्या लूकची जोरदार चर्चा 

  • Written By: Last Updated:

Dhanush: अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचे विमानतळावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (video viral) होत असतात दिसून येत आहे. त्यांच्या विमानतळावरील लूकची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. परंतु, त्याला या रूपात ओळखणं देखील अवघड झाले आहे. त्याने त्याच्या आगामी सिनेमासाठी दाढी आणि केस वाढवले असल्याचे यावेळी चर्चा केली जात आहे.


या अभिनेत्याने कॅज्युअल पँट आणि हुडी घातली होती. तसेच डोळ्यांवर त्याने गॉगल लावला होता. त्याचे केस मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, तसेच दाढीही वाढलेली असल्याचे दिसून येत आहे. त्याचे चाहते एअरपोर्टवर येऊन त्याच्याबरोबर सेल्फी काढत आहेत. ‘विरल भयानी’ने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारा अभिनेता हा दक्षिणेतील सुपरस्टार धनुष (Dhanush) असल्याचे सांगितले जात आहे.

धनुषने स्वतः गेल्या काही दिवसाअगोदर त्याचे फोटो शेअर केले होते. त्यामध्ये त्याचा हा नवीन लूक चाहत्यांना बघायला मिळाला होता. धनुषचा हा नवीन लूकमध्ये ओळखणं खूपच कठीण झाले असल्याची चर्चा होती. पण या लूकसह तो कोणत्या सिनेमात दिसणार आहे, याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. तसेच अभिनेता असण्याबरोबरच धनुष हा निर्माता, दिग्दर्शक आणि पार्श्वगायक देखील आहे.

धनुष हा गेल्या काही दिवसांपूर्वी ‘वाथी’ या सिनेमामधून चाहत्यांच्या भेटीला आला. त्याच्या अतरंगी रे या सिनेमाला देखील चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. या सिनेमात धनुषबरोबर सारा अली खान आणि अक्षय कुमार म्हणजेच सर्वांचा लाडका खिलाडी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. द ग्रे-मॅन या हॉलिवूड सिनेमात देखील धनुषने उत्तम केले आहे.

राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले

धनुष हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 5.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. धनुष हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेमध्ये आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांनी 2004 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांनी 18 वर्षांच्या संसारानंतर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता धनुष हा अभिनेते रजनीकांत याचा जावई आहे.

Tags

follow us