‘धुरंदर: द रिव्हेंज’चा इतर बॉलीवूड सिनेमांनी घेतला धसका… बऱ्याच सिनेमांचे रिलीज पुढे ढकलले

19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या मोठ्या ॲक्शन-स्पाय चित्रपटामुळे काही मोठ्या चित्रपटांच्या रिलीज तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Untitled Design (45)

Untitled Design (45)

‘Dhurandar: The Revenge’ was overshadowed by other Bollywood films : रणवीर सिंगच्या ‘धुरंदर: द रिव्हेंज’ या चित्रपटाभोवती प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. असून त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसच्या समीकरणांवरही दिसू लागला आहे. 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या मोठ्या ॲक्शन-स्पाय चित्रपटामुळे काही मोठ्या चित्रपटांच्या रिलीज तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटाला देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात स्क्रीन मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील मोठा क्लॅश टाळण्यासाठी इतर निर्मात्यांनी आपले चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

‘धुरंदर 2’ मुळे बदलले रिलीज प्लॅन

रणवीर सिंगच्या या चित्रपटाची क्रेझ लक्षात घेता निर्मात्यांनी सुरक्षित रिलीज विंडो निवडण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

देशात गॅस तुटवडा! पु्ण्यात मेस बंद स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी निघाले गावाकडं…

कोणते चित्रपट पुढे ढकलले?

यश अभिनित बहुचर्चित चित्रपट ‘Toxic’ आता 4 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. Toxic ने जगभरात युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आखाती देशातील प्रेक्षक वर्गाची बाजारपेठ गमावून चालणार नाही, असे कारण देखील त्यांनी अधिकृतपणे जाहीर केले. अदिवी शेषचा ‘डकैत’ हा चित्रपटही पुढे ढकलण्यात आला असून तो आता 10 एप्रिल 2026 ला रिलीज होणार आहे.

क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांचा निर्णय

मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिस क्लॅश टाळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ‘धुरंदर 2’ला मिळणारे प्रचंड स्क्रीन काउंट आणि त्याभोवती निर्माण झालेली उत्सुकता लक्षात घेता इतर निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांसाठी वेगळ्या तारखा निवडल्या आहेत. यामुळे ‘धुरंदर: द रिव्हेंज’*ला रिलीजच्या वेळी जवळपास मोकळे मैदान मिळणार असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती मोठी कामगिरी करतो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version