Diana In Cannes : ‘Cannes 2023’मध्ये डायना पेंटीचा (Diana In Cannes) बोल्ड लूक (Bold look) बघायला मिळाला आहे. तिचा बोल्ड लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 76 व्या आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (cannes festival) अनेक भारतीय अभिनेत्रीनी सहभाग नोंदवला आहे. 16 मे पासून सुरू झालेला हा फेस्टीव्हल 27 मे पर्यंत चालणार आहे. आत्तापर्यंत कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर इंडियन अभिनेत्रीसह जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
भारतीय अभिनेत्री डायना पेंटीने देखील फ्रेंच रिव्हिएरात सुरू असलेल्या या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावली. डायना पेंटीने यावर्षी पहिल्यांदा कान्समध्ये डेब्यू केला आहे. या अभिनेत्रीने आपल्या फॅशन सेन्सने एक वेगळी छाप सोडली आहे. तिचा रेड कार्पेटवर लूक बघून जगभरातून तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. डायनाने तिच्या रेड कार्पेट लुकसाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडला आहे.
ड्रेसमध्ये प्लंगिंग व्ही नेकलाइन आणि बलून स्लीव्हबरोबर क्रॉप केलेला ब्लेझर दिसून येत आहे. तिने सारखी दिसणारी धोती स्टाइल स्लिट ट्राउझर्स वेअर केला होता. तिचा ग्लॅम मेकअप लूक खूपच बोल्ड अंदाजात दिसून येत होता. फिल्म फेस्टिव्हलच्या फर्स्ट लूकमध्ये डायना पेंटीचे जेवढे कौतुक करावे तितके कमी असल्याचे दिसत आहे. तिने फाल्गुनी आणि शेन पीकॉकचा सुंदर सोनेरी को-ऑर्डर परिधान केला होता.
Kushal Badrike: ‘तू परत येशील तेव्हा…’ अमेरिकेला निघालेल्या बायकोसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट
तिने फिटेड लाँग स्कर्ट आणि गोल्ड थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कसह कलर मॅचिंग क्रॉप टॉप घातला होता. तिच्या ड्रेसविषयी सर्वात भारी गोष्ट म्हणजे डायनाचा पोशाख क्रिस्टल्सचा बनलेला होता. याबरोबरच तिने ग्लीटरी आयशॅडो, स्लीक बॅक आयलाइनर, ब्राँझ ब्लश आणि न्यूड लीप कलर लावल्याचे दिसून येत होता.