Download App

दिलजीत दोसांझचा ‘जोडी तेरी मेरी’ आता ओटीटीवर; कधी, कुठे, कसा, जाणून घ्या…

Jodi Teri Meri OTT Release : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या त्याच्या आगामी ‘अमरसिंग चमकीला’ (Amarsingh Chamkila) चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ पंजाबी गायक अमरसिंग चमकिलाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा त्याच्यावर आधारित आहे. मात्र या चित्रपटापूर्वीही हा अभिनेता पंजाबी गायकाच्या भूमिकेत दिसला आहे. ‘जोडी तेरी मेरी’ या चित्रपटात दिलजीतने दिवंगत गायिका सिताराची भूमिका साकारली होती. हे पात्र अमर सिंग चमकीला यांच्यापासून प्रेरित होते. आता हा चित्रपट ओटीटीवर (OTT ) प्रदर्शित होणार आहे.

‘जोडी तेरी मेरी’ आता OTT वर

\दिलजीत दोसांझचा ”जोडी तेरी मेरी” चित्रपट 5 मे 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात दिलजीतसोबत अभिनेत्री निमृत खेर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट रोम-कॉम पीरियड ड्रामा आहे. या चित्रपटाची कथा चमकीला सारखीच आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट अखेर आता ओटीटीचं दार ठोठावलं आहे.

अलीकडेच त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये माहिती देताना चित्रपट निर्माते अमरदीप सिंग यांनी सांगितले की, ‘जोडी तेरी मेरी’ हा चित्रपट 11 एप्रिल रोजी OTT प्लॅटफॉर्म ऍमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी, चित्रपट निर्मात्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात ओटीटीवर चित्रपट आणण्यास इतका विलंब का झाला आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, पेपर वर्कमुळे चित्रपट ओटीटीसाठी अडकला आहे.

समोर आली बिग बॉस OTT 3 च्या स्पर्धकांची यादी, जाणून घ्या कोण आहेत ते कलाकार

या चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या दिलजीतच्या ‘जोडी तेरी मेरी’ या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनावरही बंदी घालण्यात आली होती. तर पटियाला येथील इशदीप रंधावा यांनी न्यायालयात याचिका दाखल करून दावा केला होता की, चमकिला यांची पहिली पत्नी गुरमेल कौरने त्यांचे वडील गुरदेव सिंग यांना गायकाचा बायोपिक बनवण्यासाठी 5 लाख रुपयांना हक्क विकले होते.

पण इशदीपच्या वडिलांचे निधन झाले आणि गुरमेल कौरने ते हक्क दुसऱ्याला विकले. या मुद्द्यावर ईशदीपने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. वडिलांच्या निधनानंतर या बायोपिकचे हक्क त्यांच्या कुटुंबाकडेच राहावेत, असे त्यांनी सांगितले. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये करार झाल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

follow us