‘चमकिला’ स्टार कास्ट कपिलच्या शोमध्ये लावणार हजेरी, अभिनेत्रीने शेअर केली ‘ती’ पोस्ट

‘चमकिला’ स्टार कास्ट कपिलच्या शोमध्ये लावणार हजेरी, अभिनेत्रीने शेअर केली ‘ती’ पोस्ट

The Great Indian Kapil Show: कपिल शर्माचा (Kapil Sharma) नवीन शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (The Great Indian Kapil Show) जोरदार चर्चेत आहे. शोचा दुसरा भाग शनिवारी रिलीज करण्यात आला आहे, जिथे भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) हजेरी लावली आहे.

‘चमकिला’ची स्टारकास्ट कपिलच्या शोमध्ये पोहोचणार

आता कपिलचा पुढचा पाहुणाही समोर आला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पुढील एपिसोडमध्ये ‘चमकिला’ची स्टार कास्ट पाहुण्या म्हणून दिसणार आहे. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार आहेत. अशा परिस्थितीत कपिल या दोन स्टार्ससोबत धमाल मस्ती करणार आहे.

लग्नानंतर परिणीती पहिल्यांदाच कपिलच्या शोमध्ये दिसणार आहे. त्यामुळे शोची मजा दुप्पट होणार आहे, कारण कपिलला अभिनेत्रीच्या लग्नाबाबत नक्कीच मजा येणार हे उघड आहे.

Heeramandi Trailer : ‘हीरामंडी’ चा ट्रेलर कधी येणार? निर्मात्यांनी चाहत्यांनाच घातले कोडे

‘या’ दिवशी ‘चमकिला’ प्रदर्शित होणार

‘चमकीला’ 12 एप्रिल रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाची खूपच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाविषयी सांगायचे तर, पंजाबचा मूळ रॉकस्टार म्हटला जाणारा अमरचा चमकिला हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज