Download App

चाहत्यांना मोठा धक्का, No Entry 2 मध्ये दिसणार नाही दिलजीत दोसांझ, कारण काय?

No Entry 2 : बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटापैकी एक असणारा नो एंट्री चा लवकरच सिक्वेल प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वरुण

No Entry 2 : बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटापैकी एक असणारा नो एंट्री चा लवकरच सिक्वेल प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वरुण धवन (Varun Dhawan) , अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) दिसणार आहे. मात्र आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

माहितीनुसार, या चित्रपटात आता दिलजीत दोसांझ दिसणार नाही. नो एंट्री 2 (No Entry 2) ची घोषणा करताना निर्मात्यांनी या चित्रपटात जुनी स्टारकास्ट दिसणार नाही असा खुलासा केला होता तसेच या चित्रपटात पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ देखील असणार असल्याची माहिती समोर आली होती मात्र आता दिलजीतने नो एंट्री 2 चित्रपट सोडला असल्याची माहिती समोर आली आहे.

फिल्मफेअरच्या एका रिपोर्टनुसार, दिलजीत आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमधील काही मतभेदांमुळे दिलजीत ‘नो एंट्री 2’ चित्रपट सोडला आहे. दिलजीतने चित्रपट सोडल्याने त्याच्या जागी या चित्रपटात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

‘नो एंट्री 2’ कधी प्रदर्शित होईल?

वरुण धवन, अर्जुन कपूर असली स्टारकास्ट असणारा नो एंट्री 2 माहितीनुसार, 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर देखील असणार असल्याची माहिती समोर आली आहे मात्र याबाबात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

तुर्कीला आणखी एक दणका! तुर्किश कलाकारांना बॉलीवूडचे दरवाजे बंद; शुटिंगही थांबणार

2005 मध्ये आलेल्या ‘नो एंट्री’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान आणि बिपाशा बसू सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते.

follow us