Download App

Dipika Kakar Baby: शोएब इब्राहिम अन् दीपिका कक्कर बनले आई-बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा!

  • Written By: Last Updated:

Dipika Kakar and Shoaib Ibrahim: अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दीपिकाने आज सकाळी मुलाला जन्म दिला आहे. शोएबनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांना दिला आहे.


शोएबनं (Shoaib Ibrahim) सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आज २१ जून २०२३ रोजी आम्हाला मुलगा झाला आहे. ही प्री-मॅच्युअर डिलेव्हरी आहे. पण काळजी करण्यासारखे काही नाहीये. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी शोएब आणि दीपिका यांनी लग्नगाठ बांधली होती. शोएब आणि दीपिका यांनी ‘ससुराल सिमर का’ या सीरियलमध्ये एकत्र काम केलं होतं. युट्यूब व्लॉगच्या माध्यमातून शोएब आणि दीपिका हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांना कायम देत असतात.

दीपिकाने सध्या अभिनय क्षेत्रामधून मोठा ब्रेक घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दीपिकाने सांगितले होते की, तिला कुटुंबासाठी थोडा वेळ द्यायचा आहे आणि सध्या तिला तिच्या कामातून थोडा ब्रेक हवा आहे. तसेच शोएब हा अजून देखील या सिरीयलमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या सिरीयला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

दीपिकाने २०११ मध्ये रौनक मेहतासोबत लग्नगाठ बांधली. पण त्यांचा संसार खूप काळ काही टिकला नाही. रौनक आणि दीपिकाचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला होता. ‘ससुराल सिमर का’ या सिरीयलमुळे दीपिकाला मोठी लोकप्रियता मिळाली होती. या सिरीयलमध्ये तिनं सिमर ही भूमिका साकारली होती. शोएबनं देखील या सिरीयलमध्ये प्रेम ही भूमिका साकारली होती. या कार्यक्रमामधील शोएब आणि दीपिका यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती.

दीपिका आणि शोएब हे दोघेही एकमेकांबरोबर रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शोएबला इन्स्टाग्रामवर ३ मिलियन फॉलोवर्स आहेत तर दीपिकाला इन्स्टाग्रामवर ३.६ मिलियन फॉलोवर्स आहेत. दोघांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. तसेच दीपिकाने अनेक सिरीयलमध्ये काम केलं आहे. ती भाईजानच्या (Salman Khan) लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस 12’चीदेखील (Bigg Boss 12) विजेती ठरली होती.

Tags

follow us