मुंबई : भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. त्यांना आता डायलिसीसवर ठेवण्यात आलं आहे. तर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचीही माहिती मिळत आहे. सध्या श्याम बेनेगल यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. गेले काही दिवस ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळेच त्यांची प्रकृती ढासळल्याचं समोर आलय. नुकत्याच एका दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बेनेगल यांच्यावर राहत्या घरीच उपचार सुरु आहेत.
श्याम बेनेगल यांनी स्वतः त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, त्यांची प्रकृती ठिक नाही. त्यांच्या वर इलाज सुरू आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांना आता डायलिसीसवर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी ऑफिसला जाणे बंद केले आहे. ते सध्या एका प्रोजेक्टवर काम करत आहेत. शेख मुजीबुर्रहमान यांच्या आयुष्यावर आधारित मुजीब –द मेकिंग ऑफ ए नेश हा त्यांचा आगामी चित्रपट आहे.
Rakhi Sawant ने फ्युचर प्लॅनिंग बद्दल केला खुलासा, म्हणाली…
श्याम बेनेगल यांनी आजवर विविध चित्रपट, माहितीपट, जाहिराती आणि मालिकांसाठी दिग्दर्शन केलय. जगभराती विविध मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचे चित्रपट दाखवले गेलेत. जगभरातील चित्रपट विषयक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थांमध्येही त्यांचे नाव अगत्यानं घेतले जाते. आतापर्यंत त्याना तब्बल 8 वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. शिवाय चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.