दिव्या खोसला कुमारचे ‘Yaariyan 2’मधील गाणे घालणार धुमाकूळ; पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित

Saure Ghar Song Teaser Out: यारियां 2 च्या टीझरने चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. आता या वर्षातील सर्वात मोठ्या कौटुंबिक म्यूजिकल सिनेमातील “सौरे घर”चे पहिले गाणे २७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये गाण्यांसह ‘सनी सनी’ या गाण्याची झलक बघायला मिळाली आहे. परंतु सिनेमात आणखी मनोरंजक गाणी आहेत, जी नक्कीच चाहत्यांचे लक्ष […]

Saure Ghar Song Teaser Out

Saure Ghar Song Teaser Out

Saure Ghar Song Teaser Out: यारियां 2 च्या टीझरने चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. आता या वर्षातील सर्वात मोठ्या कौटुंबिक म्यूजिकल सिनेमातील “सौरे घर”चे पहिले गाणे २७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये गाण्यांसह ‘सनी सनी’ या गाण्याची झलक बघायला मिळाली आहे.

परंतु सिनेमात आणखी मनोरंजक गाणी आहेत, जी नक्कीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत. ‘सौरे घर’ या गाण्याचा टीझर बघता, हा एक भन्नाट डान्स नंबर आहे, जे चाहत्यांना थिरकायला भाग पडणार आहे. या सिनेमात चुलत भाऊ-बहीण यांच्यातील जबरदस्त बाँडिंग दाखवण्यात आले आहे. जे चाहत्यांना सिनेमात गुंतवून ठेवणार आहे.

‘यारियाँ 2’ मध्ये दिव्या खोसला कुमार, मीझान जाफरी आणि पर्ल व्ही पुरी, यश दासगुप्ता, अनस्वरा राजन, वारिना हुसैन आणि प्रिया वारियर आहेत. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरीज टी-सीरीज फिल्म्स आणि राव आणि सप्रू फिल्म्स प्रोडक्शन यारियां 2 सादर करणार आहेत. हा सिनेमा २० ऑक्टोबर २०२३ दिवशी सिनेमागृहात दाखल होणार आहे.

Box Office Collection:’जेलर’ने पार केला ५०० कोटींचा टप्पा; कोण हिट कोण फ्लॉप..? जाणून घ्या…

भूषण कुमार, कृष्ण कुमार, दिव्या खोसला कुमार आणि आयुष महेश्वरी निर्मित, राधिका राव आणि विनय सप्रू यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा उत्तम संगीतासह ड्रामा, इमोशन आणि कॉमेडी यांचे संपूर्ण पॅकेज आहे. राधिका राव आणि विनय सप्रू यांचा म्युजिकल परफॉर्मन्स दाखवणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये कुटुंबातील मित्राचा आणि मित्रातील कुटुंब हे दाखविण्यात आले आहे. ‘यारियां 2’ प्रेम, भावना आणि मैत्री नव्याने दाखविण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Exit mobile version