Download App

Singal Marathi Movie: ‘दोस्त दोस्त ना रहा’, अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा

Singal Marathi Movie: ‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि प्रथमेश परब (Prathmesh Parab ) या दोन जिवलग मित्रांच्या नात्यामध्ये सध्या मोठा दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमामध्ये पडतो हे नक्की आहे. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे काळजाचे मित्र आपण पाहिले आहेत. परंतु, अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेशने मोठा कांड केला आहे. असं कोणतं कारण आहे की, अभिनयच्या प्रेमाच्या आड प्रथमेश आला आहे. असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याचं उत्तर 3 नोव्हेंबर दिवशी सिनेमागृहात बघायला मिळणार आहे. त्यासाठी प्रथमेश आणि अभिनय या जोडीचा ‘सिंगल’ (Singal Marathi Movie ) हा सिनेमा तुम्हाला बघावा लागणार आहे.


अभिनय आणि प्रथमेश हे दोघे देखील ‘सिंगल’ या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा एक धमाल सिनेमा असून एक मित्र प्रेमाच्या बाजूने तर दुसरा मित्र प्रेमाच्या विरोधात काय नेमक्या करामती करणार आहेत, याची एक गंमत लवकरच बघायला मिळणार आहे. पोरीपायी दोस्तीत कुस्ती होई का…?का प्रेम जिंकेल यावर भाष्य करणारा ‘सिंगल’ हा सिनेमा प्रेक्षकांच फूल टू मनोरंजन करणार आहे, असा विश्वास अभिनय आणि प्रथमेश व्यक्त करत आहेत.

या दोघांसोबत या सिनेमात रमेश परदेशी, प्राजक्ता गायकवाड, राजेश्वरी खरात, सुरेश विश्वकर्मा आदि कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी ‘सिंगल’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या सिनेमाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत.

Apoorva Movie Trailer: तारा सुतारियाचा ‘अपूर्वा’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

या मराठी सिनेमाचे लेखन सतीश समुद्रे यांचे आहे, तर पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे दर्जेदार संगीत सिनेमाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे. हा सिनेमा 3 नोव्हेंबर दिवशी सिनेमागृहात लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज