Apoorva Movie Trailer: तारा सुतारियाचा ‘अपूर्वा’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Apoorva Movie Trailer: तारा सुतारियाचा ‘अपूर्वा’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Apoorva Movie Trailer released: बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या तिच्या आगामी ‘अपूर्वा’ (Apurva Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटातील अपूर्वा’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. (Apurva Poster ) ज्यांची खूपच चर्चा रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. आता सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात तारा सुतारियाने एका मुलीची भूमिका साकारणार आहे.

तारा सुतारियाच्या आगामी ‘अपूर्व’ या चित्रपटाची खूप प्रतीक्षा होती. आता तारा सुतारियाच्या अॅक्शन-थ्रिलर आगामी ‘अपूर्व’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या फर्स्ट पोस्टरमध्ये अभिनेत्रीचा धोकादायक लूक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री ताराचा जन्म मुंबईतील एका पारशी कुटुंबात झाला. ताराला जुळी बहीण असून तिचं नाव पिया आहे. दोघींनीही अनेक वेगवेगळ्या विविध नृत्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले आहे. तिच्या आईचे नाव टिना आणि वडिलांचे नाव हिमांशु सुतारिया आहे. वडील हिंमाशू हे एक नावाजलेले उद्योगपती आहेत.

यावर दिग्दर्शक निखिल नागेश भट्ट म्हणतात, “अपूर्वला एक सशक्त कथा जिवंत करण्याची एक उत्तम संधी होती. ताराचे नाट्यमय रूपांतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून पहिल्यांदाच आपण राजपाल यादव एका अनोख्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. तो या नवीन अवताराने चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. अभिषेक त्याच्या सर्व पात्रांना संस्मरणीय बनवतो आणि मला वाटते की त्याने अपूर्वामध्ये जे केले आहे ते त्याला आणखी पुढे घेऊन जाणार आहे. मुराद भाई, स्टार स्टुडिओ आणि डिस्ने हॉटस्टार सारख्या दिग्गजांसह या कथेवर काम करणे हा एक संस्मरणीय अनुभव होता, ज्यांनी मला कल्पना केल्याप्रमाणे ही रोमांचक कथा सांगण्यासाठी एक अद्भुत व्यासपीठ दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TARA💫 (@tarasutaria)


तारा सुतारिया या अनोख्या प्रोजेक्टबद्दल सांगतात की, “आमच्या फर्स्ट लूकला मिळालेले प्रेम आणि कौतुक पाहून मी भारावून गेले आहे. ‘अपूर्व’ हा अभिनयाच्या बाबतीत माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक अनुभव असणार आहे. या व्यक्तिरेखेची उत्कटता आणि ताकद यामुळे मला सुरुवातीपासून खूप प्रेरणा मिळाली आहे. ही भूमिका मी माझ्या करिअरला सुरुवात केल्यापासूनच करू इच्छित होतो.

Kangana Ranaut: कंगनाचं ठरलं! लवकरच बोहल्यावर चढणार, कोण असणार अभिनेत्रीचा पती?

तसेच राजपाल यादवचा खतरनाक अवतार प्रेक्षकांना चकित करेल. तो म्हणतो, “तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलात, तरी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत राहणं आणि काहीतरी वेगळं करत राहणं नेहमीच महत्त्वाचं असतं. मी अशा भूमिकेच्या शोधात होतो, जी मला यापूर्वी कधीही मिळाली नव्हती.” आजच्या प्रेक्षकांना आश्चर्य वाटेल असे काहीतरी आणि अपूर्व ही माझ्यासाठी एक रंजक अशी कथा असणार आहे.

पडद्यावर त्याच्या गतिमान अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिषेक बॅनर्जी देखील सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. म्हणतात की, “मी आतापर्यंत साकारलेल्या सर्वात भयानक पात्रांपैकी हे एक आहे आणि प्रत्येक दृश्यात वाईट आणि धोक्याची पातळी आणणे खूप आव्हानात्मक होते, परंतु एक विलक्षण टीम हा एक अद्भुत प्रवास होता. हा सिनेमा लवकरच 15 नोव्हेंबरपासून फक्त डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube