Download App

अजय देवगणच्या चाहत्यांना डबल बोनान्झा !

मुंबई : अजय देवगणच्या चाहत्यांना आता डबल बोनान्झा मिळणार आहे. कारण त्याच्या भोला सोबतच आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे. ‘मैदान’ अजय देवगणच्या भोलाचा ट्रेलर येत्या 30 मार्चला रिलीज होणार आहे. त्यामध्येच आता अजय देवगणच्या मैदान चित्रपटाचा ट्रेलर जोडलेला असणार आहे.

अजय देवगणचा भोला हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर आहे. तर मैदान हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा यांनी केलं असून यामध्ये अजय देवगणसह प्रियामणी आणि गजराज राव यांच्या भूमिका असणार आहेत. तर चित्रपटाचं प्रोडक्शन झी स्टुडिओज, बोनी कपूर, अरूणवा जॉय सोनगुप्ता आणि आकाश चावला यांनी केलं आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीआधी शरद पवारांची भूमिका स्पष्ट…

या चित्रपटाचा स्क्रिन प्ले आणि डायलॉग सायविन क्वाद्रस आणि रितेश शाह यांनी लिहिले आहेत. तर चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिलं आहे. चाहते आता चित्रपटाची आतुरतेना वाट पाहत आहेत. त्यांना हीा चित्रपट 23 जून 2023 ला भेटीला येणार आहे. दरम्यान अजय देवगणच्या भोलाची देखील चाहते आतुरतेना वाट पाहत आहेत.

Tags

follow us