अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीआधी शरद पवारांची भूमिका स्पष्ट…
पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगभूमीचे विश्वस्त शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं असतानाच शरद पवारांनी ट्टिटरद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रंगभूमीचा विश्वस्त म्हणून मी कोणत्याही पॅनेलला पाठिंबा देणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या भूमिकेमुळे रंगभूमी विश्वात अनेक चर्चा रंगल्या आहेत. पवारांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्टिट करत याबाबत माहिती दिली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या १६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. परिषदेचा तहहयात विश्वस्त या नात्याने निष्पक्षपाती राहून कोणत्याही पॅनेलला पाठिंबा जाहीर न करण्याची माझी भूमिका आहे. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा!#नाट्यपरिषदनिवडणूक
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 28, 2023
शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं, “अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक १६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. परिषदेचा तहहयात विश्वस्त या नात्याने निष्पक्षपाती राहून कोणत्याही पॅनेलला पाठिंबा जाहीर न करण्याची माझी भूमिका आहे. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा…” या शब्दांत पवार यांनी उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आपली मोट बांधण्याचं काम सुरु केलं आहे. निर्माते नवनाथ (प्रसाद) कांबळी यांच्या आपलं पॅनलने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराचा नारळही फोडल्याचं समजतंय.
Elon Musk यांची मोठी घोषणा! ट्विटर पोल्ससाठी केवळ अधिकृत खातीच ठरतील पात्र
आपलं पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरले आहेत. दरम्यान, मध्यवर्ती निवडणुकीसाठी 10 उमेदवारही घोषित करण्यात आले असून मुंबई उपनगरसाठी 4 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर दुसरकीडे दुसरा पॅनेल हा अभिनेते प्रशांत दामले यांचा असून ‘रंगकर्मी नाटक समूह’ असं त्यांच्या पॅनेलचं नाव आहे.
Ajit Pawar यांनी सांगितली… सावरकर वादाबाबत राष्ट्रवादीची भूमिका!
दरम्यान, अखिल भारतीय नाट्य परिषद कायमच उपक्रमांपेक्षा वादविवादांमुळेच अधिक चर्चेत असते. परिषदेच्या या वादांमुळेच अद्याप शतक महोत्सवी नाट्य संमेलनही आयोजित करण्यात आलं नव्हतं, त्यानंतर इतरही अनेक रंगभूमीसंदर्भातील उपक्रम रखडले आहेत. ही निवडणूक येत्या 16 एप्रिल रोजी पार पडणार असून सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक 2024 ते 2028 या काळासाठी वैध असणार आहे.