Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal Corona Tests Positive: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली. छगन भुजबळ यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. काल येवला येथून परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तपासणी केल्यावर अहवालातून ते कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे काल येवला येथे शहीद जवान अजित शेळके यांच्या कुटुंबियांना भेट घेण्यासाठी गेले होते. शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर ते नाशिकमध्ये परत आले. मात्र, त्यांना थंडी, ताप असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

छगन भुजबळांची ट्विट करून माहिती 

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

मोठी बातमी : फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब; मध्यरात्री नेमकं काय घडलं

प्रकृती स्थिर
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे येवला येथे गेले होते. येवल्यावरून परत येत असताना त्यांची अचानक तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यावेळी त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तात्काळ त्यांना घरी जाण्यास मुभा देण्यात आली. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube