Download App

Elvish Yadav: एल्विशला ईडीची नोटीस; 23 जुलैपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Elvish Yadav: एल्विश यादववर सापाची तस्करी केल्याचा आरोप आहे. आता याप्रकरणी त्याला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Snake Venom Case: एल्विश यादवचा (Elvis Yadav) अडचणी काही संपताना दिसत नाहीय. सापाचे विष विकल्याप्रकरणी यूट्यूबर एल्विश यादववर कडक कारवाई करण्यात येत आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) म्हणजेच ईडीने YouTuber सिद्धार्थ यादव उर्फ ​​एल्विश यादव याने आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाच्या विषाच्या संशयास्पद वापराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) 23 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.


ईडीने एल्विश यादवला नोटीस बजावली होती आणि त्याला 8 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तो परदेशात असल्याने त्याने काही दिवसांचा अवधी मागितला. अशा परिस्थितीत एल्विशला हजर राहण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आता त्याला 23 जुलैला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

ईडीने मे 2024 मध्ये हा गुन्हा नोंदवला होता आणि उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर (नोएडा) जिल्ह्यातील पोलिसांनी एल्विश यादव आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदवलेल्या एफआयआर आणि आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर. पीएमएलए अंतर्गत आरोप केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार एल्विश यादवला या आठवड्यात ईडीच्या लखनौ कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते, परंतु त्यांनी त्याच्या परदेश प्रवास आणि व्यावसायिक वचनबद्धतेमुळे मुदतवाढ मागितली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला हरियाणातील गायक राहुल यादव उर्फ ​​राहुल फाजिलपुरिया याची ईडीने चौकशी केली होती. राहुलचे एल्विश यादवसोबत संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. याआधी एल्विशचे सहकारी ईश्वर यादव आणि विनय यादव यांचीही चौकशी झाली आहे.

Elvish Yadav: एल्विशवर नोएडा पोलिसांची मोठी कारवाई, ‘त्या’ प्रकरणात केली अटक

एल्विश यादववर त्याच्या टोळीच्या सदस्यांसह नोएडा आणि एनसीआरच्या आसपासच्या फार्म हाऊस, प्रसिद्ध हॉटेल्स, क्लब, रिसॉर्ट्स इत्यादींमध्ये आयोजित रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष आणि जिवंत साप पुरवल्याचा आरोप होता. एल्विश यादव यांनी हे आरोप फेटाळले होते. पण नंतर पोलीस तपासात त्याचा सहभाग निश्चित झाल्यावर नोएडा पोलिसांनी 17 मार्च रोजी त्याला अटक केली.

follow us