Elvish Yadav: एल्विशवर नोएडा पोलिसांची मोठी कारवाई, ‘त्या’ प्रकरणात केली अटक

Elvish Yadav: एल्विशवर नोएडा पोलिसांची मोठी कारवाई, ‘त्या’ प्रकरणात केली अटक

Bigg Boss Winner YouTuber Elvish Yadav: ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT) विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) अनेक दिवसापासून वादांच्या भोवऱ्यात अडकला आहे. कधी सापाच्या विष प्रकरणामुळे, तर कधी मॅक्सटर्नसोबतच्या भांडणामुळे तर कधी रेस्टॉरंटमधील व्यक्तीसोबत झालेल्या भांडणामुळे तो जोरदार चर्चेत असतो. आता सापाच्या विष तस्करी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्याला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार YouTuberने सापाचे विष मागवल्याची कबुली दिली आहे.

आत्तापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार, एल्विश यादवने स्वत: पोलिसांसमोर सापाचे विष मागवल्याची कबुली दिली आहे.आता यानंतर त्यांच्या अडचणी वाढू वाढण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत पोलिस आणि एल्विशच्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. YouTuber विरुद्ध IPC, वन्यजीव संरक्षण कायदा आणि NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एल्विश यादवने नोएडा पोलिसांना खुले आव्हान दिले होते 

नोएडा पोलिसांना खुले आव्हान देणे एल्विश यादवसाठी अडचणीचे कारण बनले आहे. जर नोएडा पोलिसांनी आरोप सिद्ध केले तर कपडे उघडून नाचू, असे त्याने म्हटले होते. आता तो दिल्ली पोलिसांच्या चांगलाच तावडीत अडकला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस 8, 20, 27, 27 अ 29, 30, 32 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोषी आढळल्यास 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. दंडाचीही तरतूद आहे.

Crew Trailer: तब्बू- क्रिती- करीनाच्या आगामी ‘क्रू’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

मनेका गांधी यांनी तक्रार केली होती

भाजप खासदार आणि पीएफए ​​अध्यक्षा मनेका गांधी यांनी गुन्हा दाखल केला होता, तेव्हा रेव्ह पार्टी आणि सापाच्या विष तस्करी प्रकरणात एल्विश यादवचे नाव पुढे आले होते. त्यांनी युट्युबरला अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. तो सध्या दोषी नसल्याचे नोएडा पोलिसांनी राजस्थान पोलिसांना सांगितले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube