Elvish Yadav :बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर सहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेव पार्टी करत होते.
Elvish Yadav : .. तर मुक्काम थेट तुरुंगातच! काय आहे वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा कायदा?
दरम्यान सध्या उत्तर प्रदेश पोलिसांकडून त्याचा तीन राज्यांत तपास सुरू आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले गेले असले तरी अद्याप एल्विशला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्याचा तपास सुरू असताना दुसरीकडे त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याने आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.
🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/13WLDKJzYb
— Elvish Yadav (@ElvishYadav) November 3, 2023
काय म्हणाला एल्विश यादव?
मी सकाळी उठलो तेव्हा माध्यामांमध्ये बातम्या पाहिल्या की, मला अमली पदार्थांच्या पुरवठा केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. मात्र हे सगळ खोटं आहे. मी पोलिसांना सहकार्य करायला तयार आहे. तसेच मी थोडा जरी दोषी आढळलो तरी मी सगळी जबाबदारी घेईल. तसेच माझ्याबद्दल कोणत्याही बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे माझी बदनामी होतं आहे. असं या व्हिडीओमध्ये एल्विश यादव म्हणाला आहे.
Israel: ‘हा आमच्या अस्तित्वाचा लढा…’; इस्रायलचा युद्धबंदीला नकार, संघर्ष आणखी तीव्र होणार
दरम्यान दुसरीकेडे एल्विश यादवचे सापांसोबतचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. त्याचबरोबर त्याच्यासोबत असणाऱ्या अट करण्यात आलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचं या प्रकरणात नाव घेतलं आहे. त्यांनी सांगितलं की, एल्विश यादव रेव्ह पार्ट्यांमध्ये नशा करण्यासाठी विषारी सापांचा पुरवठा करत होता. त्यामुळे त्याच्यावर देखील एफआयआर दाखल करण्यात आलं आहे.