Israel: ‘हा आमच्या अस्तित्वाचा लढा…’; इस्रायलचा युद्धबंदीला नकार, संघर्ष आणखी तीव्र होणार

  • Written By: Last Updated:
Israel: ‘हा आमच्या अस्तित्वाचा लढा…’; इस्रायलचा युद्धबंदीला नकार, संघर्ष आणखी तीव्र होणार

Israel and Hamas war : इस्राय (Israel) आणि हमासमील (Hamas) युध्दाला 7 नोव्हेंबरला एका महिन्याचा कालावधी होईल. पण, अद्यापही दोन्हीकडून हल्ले सुरूच आहे. इस्त्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू आहेत. अशातच इस्रायलच्या सैन्यानं गाझा शहराला चारही बाजून घेरलं. इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. ही लढाई स्वसंरक्षणाची लढाई आहे आणि जोपर्यंत हमास नष्ट होत नाही तोपर्यंत ती सुरूच राहील, असं या निवेदनसात स्पष्ट करण्यात आलं.

Urfi Javed Arrest: शॉर्ट ड्रेस परिधान करणे पडले महागात! उर्फी जावेदला अटक? 

जोपर्यंत हमास नष्ट होत नाही तोपर्यंत ती सुरूच राहील, आम्ही असे केले नाही तर हमास आमच्यावर एकापाठोपाठ एक रानटी हल्ले करत राहील, असे इस्रायलने म्हटलं आहे. हमासच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या धमकीनंतर इस्रायल सरकारने निवेदन जारी केलं.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिओर हयात म्हणाले की, हमासने केलेल्या रानटी हल्ल्यानंतर स्वसंरक्षणार्थ सुरू झालेला हा लढा होता. गाझा पट्टीतून हमासचे नियंत्रण संपवणे हा इस्रायलचा उद्देश आहे. हयात म्हणाले की, 7 ऑक्टोबर रोजी आम्ही हमासच्या विरोधात युद्ध सुरू केले. एका रानटी हल्ल्यानंतर स्वसंरक्षणाची ही लढाई आहे. हमासचा खात्मा करणे ही आता आमच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.

हयात म्हणाले की, जर आम्ही हे केले नाही तर हमास एकामागून एक नरसंहार करत राहील. हे आम्ही म्हणत नाही, तर हमासच्या नेतृत्वानंच तसं विधान केलं. हमासच्या एका सर्वोच्च नेत्याने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे कौतुक केलं आणि पुन्हा संधी मिळाल्यास इस्रायलचा नाश होईपर्यंत पुन्हा असे हल्ले करत राहू, असं विधान केल्यासं हयात यांनी सांगितलं.

हमासच्या सर्वोच्च नेत्याची दिली धमकी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासचे गाझी हमाद यांनी लेबनीज टेलिव्हिजन वाहिनीशी बोलताना सांगतिलं की, इस्रायल हा असा देश आहे ज्याला आमच्या भूमीवर स्थान नाही. आम्हाला त्यांना संपवायचं आहे. कारण, ते अरब आणि इस्लामिक देशांत राजकीय, लष्करी आणि सुरक्षा विध्वंस घडवू शकतात.

दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी सुमारे तीन हजार हमास दहशतवादी इस्रायलच्या सीमेत घुसले आणि हवाई, जमीन आणि समुद्र अशा तिन्ही बाजूंनी हल्ला केला. या काळात इस्रायलमध्ये सुमारे 1400 लोक मारले गेले आणि 245 लोकांना ओलीस ठेवण्यात आले. यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये हमासच्या ठिकाणांवर बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये आतापर्यंत 9 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलला सर्वतोपरी मदत करणार – अँटनी ब्लिंकन
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री शुक्रवारी पुन्हा एकदा तेल अवीव येथे पोहोचले. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर त्यांची ही तिसरी तेल अवीव भेट आहे. आपल्या दौऱ्यात अँटोनी ब्लिंकन इस्रायलच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. इस्रायलनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉर्डनला भेट देणार आहेत. इस्रायलला पोहोचल्यानंतर अँटोनी ब्लिंकन यांनी इस्रायलला सर्वतोपरी मदत देण्याच्या आश्वासनाचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube