Download App

एल्विश यादवच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात दाखल होणार एफआयआर

Elvish Yadav : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारा युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एल्विश यादवच्या (Elvish Yadav) अडचणीत पुन्हा एकदा

  • Written By: Last Updated:

Elvish Yadav : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारा युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एल्विश यादवच्या (Elvish Yadav) अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार गाझियाबात न्यायालयाने (Ghaziabad Court) एल्विश यादव विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहे. एल्विशवर मनेका गांधी यांच्या एनजीओ पीपल फॉर अँनिमल्सचे सदस्य सौरभ गुप्ता यांच्या सोसायटीत जबरदस्तीने प्रवेश करण्याचा आरोप आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ गुप्ता (Saurabh Gupta) यांनी गाझियाबाद न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारित, एल्विश यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर त्यांच्या सोसायटीत जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला होता. याशिवाय, एल्विश यादववर सौरभ गुप्ता आणि गौरव यादव यांचा पाठलाग करण्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात नंदग्राम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहचले. या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने आता एल्विश यादव विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Video : कराडला गोत्यात आणणाऱ्या धसांवर गंभीर आरोप; उपोषण करत पीडितेकडून न्यायाची मागणी

तर दुसरीकडे एल्विश यादव टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘लाफ्टर शेफ्स 2’ मध्ये दिसणार आहे. ‘लाफ्टर शेफ्स 2’ 25 जानेवारीपासून कलर्स टीव्हीवर दिसणार आहे. यावेळी देखील भारती सिंग हा शो होस्ट करणार आहे. तर एल्विश यादव व्यतिरिक्त मन्नारा चोपडा, अब्दू रोजिक, रुबिना दिलाइकसह अनेक स्टार दिसणार आहे.

एकनाथ शिंदे गावाला अन् त्यांचे लाडके मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत…, आदित्य ठाकरेंचा टोला

follow us