Video : कराडला गोत्यात आणणाऱ्या धसांवर गंभीर आरोप; उपोषण करत पीडितेकडून न्यायाची मागणी
MLA Suresh Dhas : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप (BJP) आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराडवर (Walmik Karad) गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहे.
तर दुसरीकडे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई देखील केली आहे. यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणीने भाजप आमदार सुरेश धसांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तुषार कोकणे या युवकाने लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप या व्हायरल व्हिडिओमध्ये पीडित तरुणीने केलं आहे. तसेच आरोपीने धस साहेबांचा नातेवाईक म्हणून माझ्यावर राजकीय दबाव टाकला असेही या व्हिडिओमध्ये पीडित तरुणीने म्हटले आहे. आरोपीचे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज रद्द केला होता. त्यानंतर त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी मला खोटं बोलून या प्रकरणापासून दूर ठेवले. माझ्याकडून कागदावर तीन चार साह्य करून घेतले मात्र त्यानंतर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
बीडमधील आष्टी येथील तरुणीने एका तरुणावर अत्याचाराचा आरोप केलाय. या तरुणाने आमदार सुरेश धस यांचा नातेवाईक म्हणून माझ्यावर राजकीय दबाव टाकला असा आरोपी या व्हिडिओमध्ये पीडित तरुणीने केलाय. #BeedCrime #beed pic.twitter.com/IfnSVe8s2e
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) January 24, 2025
तर या प्रकरणात सुरेश धस यांचा नाव वापरून तुषार कोकणे, नितीन कोकणे आणि विकास धस यांनी माझ्यावर दबाव आणला आणि मला घाण घाण शिव्या दिल्या असा आरोप देखील पीडित तरुणीने या व्हायरल व्हिडिओमध्ये केला आहे.
ही घटना नोव्हेंबर – डिसेंबर 2021 ची असून या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात मे 2023 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एक महिना आरोपीच्या चुलत्याने आरोपीला फरार करून ठेवले होते. तसेच त्याने माझ्यावर राजकीय दबाव टाकला असा आरोप देखील पीडित तरुणीने केला आहे.
‘मार्केटींग करून नेता होता येत नाही तर…,’ अमित शाहांचा शरद पवारांना टोला
तसेच आरोपीने माझ्याशी लग्न करावे नाहीतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील पीडित तरुणीने या व्हिडिओमध्ये केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामुळे भाजप आमदार सुरेश धस अडचणीत येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.