Download App

इंदिरा इज इंडिया…; कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’चा टीझर रिलीज

Emergency New Teaser: अभिनेत्री कंगना रनौतच्या (kangana ranaut)’इमर्जन्सी’ (Emergency)या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटात कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi)यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा एक टीझर (Teaser)आधीच रिलीज झाला आहे, त्याद्वारे या कंगनाचा लूक समोर आला. आता नवीन टीझरमध्ये कंगना रानौत आपल्या देशाच्या रक्षणाची शपथ घेताना दिसत आहे. यामध्ये इंडिया इज इंदिरा अॅण्ड इंदिरा इज इंडिया असा ट्रेलरमधील डायलॉग आहे. उद्या देशातील आणीबाणीला (इमर्जन्सी)48 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचा टीझर रिलीझ झाला आहे. (emergency-movie-new-teaser-out-kangana-ranaut-says-indira-is-india)

शंभर टक्के मंत्री म्हणून शपथ घेणार, आमदार संतोष बांगरांचा मंत्रीपदावर दावा, शिंदेंचं टेन्शन वाढलं

कंगना रानौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. याआधी या चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. याशिवाय ती या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. कंगना रनौत व्यतिरिक्त अनुपम खेर(Anupam Kher), श्रेयस तळपदे (Shreyas Talpade)आणि महिमा चौधरी (Mahima Chaudhary) हे चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


टीझरच्या सुरुवातीला 25 जून 1975 लिहिले आहे. या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. यानंतर लोक रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे पोलीस लाठीचार्ज आणि गोळीबार करत आहेत. यानंतर अनेक वृत्तपत्रांच्या क्लिपिंग दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये देशात आणीबाणी लागू केल्याचे लिहिले आहे.

Video : सीतेची भूमिका संपताच पुन्हा तसेचं… क्रितीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

त्यातच पुढे सर्व विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली. टीव्ही प्रसारण रद्द करण्यात आल्याचे दिसत आहे. टीझरच्या शेवटी इंदिरा गांधींच्या व्यक्तिरेखेतील कंगना रानौत म्हणते, इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा.

या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर श्रेयस तळपदे या चित्रपटात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत आहे. ते आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेले होते.

याशिवाय महिमा चौधरी या चित्रपटात पत्रकार पुपुल जयकर यांची भूमिका साकारत आहे. त्या इंदिरा गांधींची मैत्रीण होत्या. वैशाख नायर इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी यांची भूमिका साकारत आहेत, तर सतीश कौशिक माजी केंद्रीय मंत्री जगजीवन राम यांची भूमिका साकारत आहेत. मिलिंद सोमण या चित्रपटात फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारत आहे.

Tags

follow us