Video : सीतेची भूमिका संपताच पुन्हा तसेचं… क्रितीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Video : सीतेची भूमिका संपताच पुन्हा तसेचं… क्रितीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Kriti Senon : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. सिनेमातील सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. त्यानंतर चित्रपटाच्या स्टारकास्टला देखील प्रचंड ट्रोल केलं जात आहे. त्यात आता चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सेननला देखील नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. ( Kriti Senon troll for short dress after Adipurush Seeta roll )

पंजाब डख यांचा अंदाज खरा ठरला, राज्यात पावसाला सुरुवात…

अलिकडेच पापाराझींनी क्रितीला मुंबईतील वर्सोवातील मुकेश छाबडा यांच्या ऑफिसमध्ये जाताना पाहिले. त्यानंतर क्रिताचा हो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून लगेचच नेटकऱ्यांनी चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सेननला प्रचंड ट्रोल करायला सुरूवात केली.

पंकजा मुंडेंना दोन वर्षाआधीच एमआयएमची ऑफर पण…; ओवैसींचा मोठा दावा

या व्हिडीओमध्ये क्रितीने शॉर्ट्सवर लॉंग जॅकेट घातले होते. म्हणून नेटकऱ्यांनी क्रिती सेननला प्रचंड ट्रोल करायला सुरूवात केली. कारण आदिपुरूष चित्रपटाच्या दरम्यान क्रितीने पारंपारिक लूकवर भर दिला होता. तसेच ती धार्मिक स्थळांनाही जात होती. त्यामुळ आता सीतेची भूमिका संपली आणि पुन्हा तसेच कपडे घालायला सुरूवात केली. अशी टीका तिच्यावर होत आहे.

यामध्ये एका नेटकऱ्याने लिहिले की, सीतेची भूमिका संपली आणि पुन्हा तसेच कपडे घालायला सुरूवात केली. तसेच एका लिहिले की, क्रिती सेनन ही फ्लॉप हिरॉईन आहे. तिने आणि ओम राऊतने चित्रपटाची वाट लावली. अशी टीका केली आहे. दरम्यान या चित्रपटाच्या कमाईवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. रिलीजच्य आठव्या दिवशी तर चित्रपटाची कमाई अगदीच मंदावली. आठव्या दिवशी केवळ 3.50 कोटी या चित्रपटाने कमावले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube