‘ए ट्विटर भैया ! पैसे भर दिए हैं, अब तो नील कमल लगाय दो’, ब्लू टीक गेल्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट

Amitabh Bachchan : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) शुक्रवारी मोठा निर्णय घेत अनपेड ट्विटर खात्यांवरील ब्लू टीक (Blue Tick) काढून टाकले. यामध्ये राजकीय नेते अन् बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे. ट्विटरच्या या निर्णयाचा फटका बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही बसला. त्यानंतर आता बच्चन यांनीही आपल्या खास शैलीत ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ […]

Amitabh Bachchan यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर! 24 एप्रिलला होणार खास सोहळा

Amitabh Bachchan : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) शुक्रवारी मोठा निर्णय घेत अनपेड ट्विटर खात्यांवरील ब्लू टीक (Blue Tick) काढून टाकले. यामध्ये राजकीय नेते अन् बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे. ट्विटरच्या या निर्णयाचा फटका बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही बसला. त्यानंतर आता बच्चन यांनीही आपल्या खास शैलीत ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ऑफिशियस ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहीली आहे. “T 4623 ए ट्विटर भैया ! सुन रहे है ? अब तो पैसे भी भर दिए हैं हम.. तो उ जो नील कमल होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लाई भैया, ताकि लोग जान जायें की हम ही हैं. हाथ तो जोड रहे हैं हम | अब का, गोडवा जोडे पडी का ??” असे मजेदार  ट्विट त्यांनी केले आहे.

बिग बींच्या या ट्विटवर त्यांचे फॅन्सही मजेदार कमेंट करत आहेत. एका ट्विटर युजरने म्हटले, की आता तुम्हालाही लाइनमध्ये यावे लागेल आणि वाट पहावी लागेल. आधी तुम्ही जिथे उभे राहतात होतात तेथूनच लाइन सुरू व्हायची. आणखी एकाने म्हटले, ‘बच्चन साहेब, उ अंग्रेज हौ केहू क नाही सुनत हौ, दुइ तीन दिन त इंतजार करईबै क.’

दरम्यान, ट्विटरने घेतलेल्या या निर्णयाचा फटका फक्त बच्चन यांनाच नाही तर शाहरुख खान, आलिया भट्ट यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार मंडळींना बसला आहे. ट्विटरचा मालक एलन मस्कने अनपेड अकाउंट्सचे ब्लू टीक काढून टाकण्याची घोषणा केली होती. शुक्रवारी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली.

विजयानंतर दामलेंचं रंगकर्मी नाटक समूह पॅनल शरद पवारांच्या भेटीला!

ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत मार्केट टू मार्केट भिन्न आहे. भारतात आयफोन आणि अँड्रॉईड स्मार्टफोन्सच्या माध्यमातून सबस्क्रिप्शनची किंमत 900 रुपये प्रति महिना अशी आहे. ट्विटर वेबसाइटवर किंमत कमी करून 650 रुपये प्रति महिना अशी आहे.

Exit mobile version