‘डिस्को डान्सर’चे निर्माते बी सुभाष यांच्यावर दु:खाचा डोंगर! मुलीचे निधन

डिस्को डान्सर चित्रपटाचे दिग्दर्शक बी सुभाष यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बी सुभाष यांची मुलगी श्वेता बब्बरचं गंभीर आजाराने निधन झालं आहे. तिचं वय अवघे 48 होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात श्वेता बब्बरने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. चंद्रपुरात शिवप्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान राडा; संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरवादी संघटनांकडून विरोध श्वेता बब्बर 19 जुलैच्या रात्री घरात […]

B Subhash & Shweta Babar

B Subhash & Shweta Babar

डिस्को डान्सर चित्रपटाचे दिग्दर्शक बी सुभाष यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बी सुभाष यांची मुलगी श्वेता बब्बरचं गंभीर आजाराने निधन झालं आहे. तिचं वय अवघे 48 होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात श्वेता बब्बरने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे.

चंद्रपुरात शिवप्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान राडा; संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरवादी संघटनांकडून विरोध

श्वेता बब्बर 19 जुलैच्या रात्री घरात असतानाच अचानक पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्वेताच्या पाठीच्या कण्यामध्ये क्लॉटिंग झाल्याचं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. पाठीच्या कण्यामध्ये क्लॉटिंग झाल्याने शरीरातील इतर भागांत रक्तपुरवठा होत नव्हता.

Jayant Patil : अजितदादांनी दिला बक्कळ निधी; जयंत पाटील म्हणाले, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून…

श्वेताने तीन दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिली अखेर तिने जगाचा निरोप घेतला आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये बी सुभाष यांची पत्नी तिलोतिम्मा यांचं निधन झालं होतं, त्यानंतर आता मुलीच्या निधनामुळे ते तूटले आहेत. तिलोतिम्मा अनेक वर्षांपासून गंभीर आजारांशी झुंज देत होत्या.

पत्नीच्या किडनीच्या आजाराची माहिती मिळताच त्यांनी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु डॉक्टरांनी काही चाचण्या केल्यानंतर समजलं की, त्यांना फुफ्फुसाचाही त्रास आहे, त्यामुळे किडनी प्रत्यारोपण करता आले नाही, कारण त्याचा तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं बी सुभाष यांनी सांगितले होतं.

Exit mobile version