Download App

National Film Awards: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘या’ दमदार कलाकारांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

69th National Film Awards: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सुरुवात झाली आहे. (National Film Awards 2023) 24 ऑगस्ट दिवशी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आज त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

यामध्ये आलिया भट्ट (alia bhatt), क्रिती सेनॉन (kriti sanon) आणि अल्लू अर्जुन (allu arjan) यासारख्या स्टार्सची नावे विजेत्या यादीमध्ये आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि क्रिती सॅननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट, अल्लू अर्जुन हे दिल्लीमध्ये हजेरी लावली आहेत.

देशातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय सिनेमा पुरस्कारांची सुरुवात 1954 साली सुरु झाली. हा पुरस्कार सोहळा भारत सरकारच्या सिनेमा महोत्सव संचालनालयाकडून आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठीच्या विजेत्यांची यादी –
सर्वोत्कृष्ट अभिनेता: अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: रोक्ट्रेरी: द नंबी इफेक्ट (आर माधवन मुख्य भूमिकेत)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन (गोदावरी-द होली वॉटर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पल्लवी जोशी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पंकज त्रिपाठी
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर- सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर- सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट छायांकन- सरदार उधम सिंग

Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

सर्वोत्कृष्ट संपादन- गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट- गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट-चेल्लो शो
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- होम
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट- काडैसी विवसयी
सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट – समांतर
सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट- उपेना
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार – भावीन रबारी
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- 777 चार्ली

विशेष ज्युरी पुरस्कार- शेरशाह
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – आरआरआर
सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शन पुरस्कार- RRR
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- RRR
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर
सर्वोत्कृष्ट नॅरेशन व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट- कुलदा कुमार भट्टाचार्जी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- इशान दिवेचा
सर्वोत्कृष्ट संपादन- अभ्रो बॅनर्जी नॉन फीचर फिल्म

Tags

follow us