Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

Prashant Damle: प्रशाांत दामले (Prashant Damle) हे अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष असण्यासोबत लोकप्रिय अभिनेते आहेत. गेल्या चार दशके असंख्य मराठी नाटके, चित्रपट, आणि टीव्ही सीरियलमध्ये आपल्या अभिनयाने एक अनोखी छाप निर्माण केली आहे. प्रशाांत दामले यांना मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार (Vishnudas Bhave Gaurav Padak Award) जाहीर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prashant Damle (@damleprashant)


अभिनेते प्रशांत दामलेंना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदा दिले जाणारे हे 56 वे गौरव पदक असणार आहे. 5 नोव्हेंबर दिवशी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गौरवपदक, रोख रक्कम 25 हजार स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप असणार आहे.

विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत असल्याना हा पुरस्कार देण्यात येत असतो. आतापर्यंत गेल्या ५४ वर्षांमध्ये हा नाट्यक्षेत्रातील मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Actor Bharat Thakur: ‘क्लब 52’ सिनेमातील अभिनेता भरत ठाकूरचा खडतर प्रवास!

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा जादुगार; अभिनेता प्रशांत दामले

प्रशांत दामले यांचा जन्म ५ एप्रिल १९६१ रोजी मुंबई शहरात झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव पुरुषोत्तम दामले आहे. त्यांचे लग्न गौरी दामले यांच्याशी झाले असून त्यांना दोन मुली आहेत. मुंबईत लहानाचे मोठे झाले असलेले प्रशांत दामले यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांना लोकांना सतत हसवायला खूप आवडते आणि ते त्यांच्या कलेच्या माध्यमातून हे काम उत्तमपणे पार पाडत आहेत. प्रशांत दामले यांना ‘टूर टूर’ या सुप्रसिद्ध मराठी नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. हे त्यांच्यासाठी एक मोठे यश ठरले आणि अशा प्रकारे त्यांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर प्रवेश केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube