ED Attached S Shankar Property : तामिळ चित्रपट निर्माते दिग्दर्शक एस. शंकर (S. Shankar) यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आताही एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने रजनीकांत आणि ऐश्वर्या राय अभिनीत चित्रपट एंथिरनचे दिग्दर्शक एस. शंकर यांच्या तीन संपत्ती जप्त केल्या आहेत. या संपत्तीचे मूल्य जवळपास दहा कोटी रुपये आहे. ईडीच्या या कारवाईने तामिळ चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे. एंथिरन चित्रपटाची कथेशी संबंधित एक साहित्यिक चोरीच्या प्रकरणात ही कारवाई झाली आहे. हा चित्रपट सन 2010 मध्ये प्रदर्शित झाला होतो. या चित्रपटाला चांगलं यश मिळालं होतं.
Rajinikanth: 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा मणिरत्नम- रजनीकांतची जादू मोठ्या पडद्यावर!
रिपोर्ट्सनुसार दहा कोटी रुपये किंमतीची संपत्ती धन शोधन निवारण अधिनियमाच्या कलमांनुसार जप्त करण्यात आली आहे. सन 2011 मध्ये लेखक आरुर तमिळनाडन यांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात तक्रार दाखल केली होती. एंथिरन चित्रपटात त्यांची कथा जिगुबाच्या बाबतीत समानता आहेत. त्यामुळे तमिलनाडन यांनी दिग्दर्शक शंकर यांच्या विरुद्ध कॉपीराइट अधिनियम 1957 सह भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला होता.
तमिलनाडन यांच्या तक्रारीनंतर ईडीने आर्थिक तपास सुरू केला. या तपासा दरम्यान लक्षात आले की शंकर यांना चित्रपटावर काम करण्यासाठी 11.5 कोटी रुपये मिळाले होते. यामध्ये कथेचा विकास, स्क्रिप्ट, संवाद आणि दिग्दर्शन या घटकांचा सहभाग होता. या प्रकरणाने वेग घेतला त्यावेळी फिल्म अँड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका अहवालात जिगुबा आणि एंथिरनमधील समानतेबाबत उल्लेख करण्यात आला होता. कथा, पात्रांचा विकास आणि थीमच्या बाबतीत एक सारखेपणा जाणवत असल्याचा इशारा या अहवालात करण्यात आला होता. यामुळे तमिलनाडन यांच्या साहित्याची चोरी केल्याच्या दाव्यांना बळ मिळाले.
तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी एंथिरन या चित्रपटात प्रमुख भू्मिका साकारली होती. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायही मुख्य भुमिकेत होती. या चित्रपटाने जगभरात 290 कोटी रुपये कमावले होते. या यशानंतर दिग्दर्शक एस. शंकर भारतातील दर्जेदार दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु, आता साहित्य चोरीचा डाग त्यांच्या करियरवर लागला आहे.
ज्याची काळजी होती ते घडलंच, रजनीकांतच्या मुलीचा संसार मोडला; कोर्टाचा निर्णय