खबरदार! ‘तारक मेहता’चा कंटेंट वापराल तर.. दिल्ली उच्च न्यायालयाने घातली बंदी, कारण काय?

हिंदी टेलिव्हिजन जगतातील अतिशय लोकप्रिय टिव्ही शो तारक मेहता का उलटा चश्मा बाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला

Delhi High Court

Delhi High Court

Delhi High Court : हिंदी टेलिव्हिजन जगतातील अतिशय लोकप्रिय टिव्ही शो तारक मेहता का उलटा चश्मा बाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. या आदेशातून मालिकेच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मालिकेचे निर्माते नीला फिल्म प्रॉडक्शन प्रा. लिमिटेडने सांगितले की या मालिकेचे टायटल, यातील पात्र, चेहरे, त्यांचे हावभाव, डायलॉग आणि अन्य महत्वाच्या गोष्टी कायद्यानुसार संरक्षित केल्या गेल्या आहेत.

खरंतर काही दिवसांपासून या मालिकेतील पात्र, त्यांची नावे आणि इमेज चुकीच्या पद्धतीने वापरले जात होते. सोशल मीडियावर तर अशा कंटेटचा सुळसुळाट झाला आहे. ही बाब शो निर्मात्यांच्या लक्षात आली. चुकीच्या पद्धतीने या गोष्टींचा वापर होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. अनेक सोशल मिडिया अकाउंट्स, वेबसाइट्स आणि युट्यूब चॅनेल्स बेकायदेशीर पद्धतीने तारक मेहता मालिकेतील पात्रांचा वापर करत होते. अॅनिमेशन, डीपफेक, एआय जनरेटेड फोटो तयार करून त्या माध्यमातून अश्लील कंटेट तयार करून त्याचा प्रसार केला जात होता.

TMKOC: तारक मेहता मधल्या टप्पूने चाहत्यांना दिली खुशखबर; फोटो शेअर करत लिहिले

न्या. मिनी पुष्करणा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. टिव्ही निर्मात्यांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयात असे म्हटले आहे की यु्ट्यूबवरून सर्व आपत्तीजनक व्हिडिओ हटविण्यासाठी 48 तासांचा वेळ देण्यात येत आहे. यानंतरही जर अश्लील कंटेंट हटवला गेला नाही तर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून त्या लिंकला ब्लॉक करण्यात येईल. यासाठी कठोर कारवाई देखील करण्यात येईल.

न्यायालयाच्या या निर्णयावर मालिकेचे निर्माते असित कुमार यादव यांनी समाधान व्यक्त केले आहे. आमच्या संपत्तीचे संरक्षणाचे महत्व ओळखण्यासाठी आम्ही दिल्ली उच्च न्यायालयाचे आभारी आहोत. कोर्टाचा हा आदेश मोठा संदेश देत आहे. या आदेशाने आमचे संरक्षण झालेच शिवाय या मालिकेत सहभागी असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास देखील वाढला आहे.

 तारक मेहता का उल्टा चष्माचे 4000 भाग पूर्ण; सेटवर जंगी सेलिब्रेशन, बबिता जीने शेअर केली खास पोस्ट

Exit mobile version