‘Evil Dead Rise’ wins critical acclaim; set to release in multiple Indian languages on July 10 : ‘ईव्हिल डेड’ या लोकप्रिय हॉरर फ्रँचायझीतील नवा चित्रपट ‘ईव्हिल डेड बर्न’ 10 जुलै रोजी भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. फ्रेंच दिग्दर्शक सेबॅस्टियन व्हॅनिचेक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय समीक्षकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
चित्रपटाचे निर्माते आणि मूळ ‘ईव्हिल डेड’ मालिकेचे निर्माते सॅम रायमी तसेच रॉब टॅपर्ट यांनी या नव्या भागाची निर्मिती केली आहे. ट्रेलरमधूनच प्रेक्षकांना थरारक अनुभवाची झलक मिळाली होती. आता चित्रपट पाहिलेल्या समीक्षकांनी हा फ्रँचायझीतील आतापर्यंतचा सर्वाधिक भयावह आणि क्रूर चित्रपट असल्याचे म्हटले आहे.
केतनला धक्क कुणी दिला? पुरावा नाही, सियाच्या लाय डिटेक्टर टेस्टसाठी पोलिसांची न्यायालयाकडे मागणी
समीक्षक बिल ब्रिया यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, “हा चित्रपट मालिकेतील सर्वाधिक क्रूर ठरू शकतो. सेबॅस्टियन व्हॅनिचेक यांनी भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर प्रेक्षकांना हादरवणारा अनुभव दिला आहे. त्यातील काळा विनोदही तितकाच प्रभावी आहे,” असे म्हटले.
फाळणीवेळी भारतात आलेले लोक निर्वासित नव्हते, ते मातृभूमीसाठी लढणारे संघर्ष योद्धे होते – मोहन भागवत
तर पेरी नेमिरॉफ यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक करत, “ईव्हिल डेड फ्रँचायझीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. व्हॅनिचेक यांनी पारंपरिक शैली जपत अत्यंत कल्पक, धक्कादायक आणि रोमांचक दृश्यांची मेजवानी सादर केली आहे. प्रत्येक प्रसंग प्रभावी असून हा चित्रपट वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतो,” असे नमूद केले.
देवाचाच प्लॅन, आज मी बेरोजगार… अचानक नोकरी गेलेल्या Wipro कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल…
समीक्षक फ्रेडरिक नुती यांनी या चित्रपटाला “रक्तरंजित, भीतीदायक आणि तितकाच मनोरंजक” असे संबोधले. त्यांनी कलाकारांच्या अभिनयासह कथानकाचेही विशेष कौतुक केले आणि हा चित्रपट फ्रँचायझीतील आणखी एक दमदार अध्याय असल्याचे म्हटले. स्कॉट मेंडेलसन यांनी चित्रपटाची निर्मिती, दृश्य मांडणी आणि मोठ्या पडद्यावरील अनुभवाची प्रशंसा करत हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असल्याचे सांगितले.
”शिंदेंकडे आलेल्या सहा खासदारांना भाजपात यायचं होतं पण, आम्ही दार उघडलं नाही”
तर ज्युनियर फेलिक्स यांच्या मते, “‘ईव्हिल डेड बर्न’ सुरुवातीपासून शेवटपर्यंत थराराने भरलेला आहे. तब्बल 110 मिनिटे प्रेक्षकांना श्वास रोखून ठेवणारे भयावह प्रसंग अनुभवायला मिळतात. सेबॅस्टियन व्हॅनिचेक यांनी दृश्यांसोबतच ध्वनीचा वापर इतक्या प्रभावीपणे केला आहे की तो अंगावर काटा आणतो.”
समीक्षक सायमन थॉम्पसन यांनीही चित्रपटाला अत्यंत भीषण आणि धक्कादायक अनुभव असल्याचे सांगत, “हा चित्रपट कोणतीही तडजोड न करता भीतीचा परमोच्च बिंदू गाठतो. विशेष म्हणजे, चित्रपट संपल्यानंतरचा पोस्ट-क्रेडिट सीन नक्की पाहावा,” असा सल्लाही दिला. सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडियातर्फे ‘ईव्हिल डेड बर्न’ हा चित्रपट 10 जुलै 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
