केतनला धक्क कुणी दिला? पुरावा नाही, सियाच्या लाय डिटेक्टर टेस्टसाठी पोलिसांची न्यायालयाकडे मागणी
Ketan Agrawal murder case तील मुख्य आरोपी सिया गोयलची लाई डिटेक्टर चाचणीची परवानगी मिळावी, यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला.
Ketan Agrawal murder case No evidence Who pushed Ketan police seeking a lie detector test for Siya to court : पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तपास अधिक गतीने सुरू असून, मुख्य आरोपी सिया गोयल हिची लाई डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी घेण्यास परवानगी मिळावी, यासाठी पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात अर्ज दाखल केला. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात आरोपींच्या जबाबांव्यतिरिक्त केतन अग्रवाल यांना दरीत नेमके कोणी ढकलले, याचा थेट प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा ठोस पुरावा अद्याप हाती लागलेला नाही.
फाळणीवेळी भारतात आलेले लोक निर्वासित नव्हते, ते मातृभूमीसाठी लढणारे संघर्ष योद्धे होते – मोहन भागवत
पोलिसांच्या माहितीनुसार, सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांचे जबाब आधीच नोंदविण्यात आले आहेत. मात्र, तपासाला नवी दिशा मिळावी आणि आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळावेत, यासाठी पॉलीग्राफ चाचणी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले.यावर प्रतिक्रिया देताना सिया गोयलचे वकील विपुल दुशिंग यांनी सांगितले की, तपास यंत्रणेने न्यायालयात परवानगी मागितली असली तरी अशी चाचणी घेण्यापूर्वी अनेक कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तसेच, पॉलीग्राफ चाचणीसाठी आरोपीची संमती अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देवाचाच प्लॅन, आज मी बेरोजगार… अचानक नोकरी गेलेल्या Wipro कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल…
तज्ज्ञांच्या मते, प्राथमिक किंवा पूरक पुरावे मर्यादित असतील, अशा प्रकरणांमध्ये तपासासाठी पॉलीग्राफ चाचणीचा आधार घेतला जातो. मात्र, या चाचणीचा अहवाल न्यायालयात स्वतंत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. तपासादरम्यान नवे धागेदोरे मिळवण्यासाठीच त्याचा वापर केला जातो.18 जून रोजी पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावरील दरीतून पडून मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण देशभर चर्चेत आले. केतन यांचा सिया गोयलसोबत साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये त्यांचा विवाह होणार होता.
”शिंदेंकडे आलेल्या सहा खासदारांना भाजपात यायचं होतं पण, आम्ही दार उघडलं नाही”
तपास यंत्रणांचा आरोप आहे की, सिया गोयल आणि तिचा कथित मित्र चेतन चौधरी यांनी कट रचून केतन अग्रवाल यांची हत्या केली. या घटनेनंतर दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इंडियन आयडॉल च्या मंचावर पुन्हा जाण हे घरी जाण्यासारख वाटतं – अभिजीत सावंत !
दरम्यान, तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. घटनेनंतर काही काळ केतन अग्रवाल यांचा मोबाईल सिया गोयलकडे होता. नंतर तो तिच्याकडून केतनच्या कुटुंबीयांकडे देण्यात आला. या काळात मोबाईलमधील कोणताही डेटा हटविण्यात आला किंवा त्यामध्ये छेडछाड करण्यात आली का, याचा तपास पोलीस आणि न्यायवैद्यक तज्ज्ञ करत आहेत.
सुजय विखेंच्या वक्तव्यापासून शेतकरी प्रश्नांपर्यंत; विवेक कोल्हेंनी मांडली आपली सविस्तर भूमिका
तपासाचा भाग म्हणून 1 जुलै रोजी पोलिसांनी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळाची पुनर्रचना केली. यापूर्वी रविवारी सिया गोयललाही घटनास्थळी नेण्यात आले होते. त्यावेळी डमीचा वापर करून कथित घटनेचा संपूर्ण क्रम पुन्हा उभा करण्यात आला होता.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, घटनेनंतर केतन अग्रवाल यांचा मोबाईल सिया गोयलच्या ताब्यात आला होता. या काळात मोबाईलमधील महत्त्वाची माहिती हटविण्यात आली का किंवा त्यात कोणताही फेरफार झाला का, याचा फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सखोल तपास सुरू आहे.