Maharashtra Rain Alert : दिलासा, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
Maharashtra Rain Alert : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तर आता हवामान विभागाकडून एक दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसााचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सर्तक राहवे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा पावसाची (Maharashtra Rain Alert) सुरुवात होणार असून 6 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. रत्नागिरी, पुणे (Pune Rain Alert) , सातारा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
महिलांनो, लग्नानंतर संपत्तीचा वारसदार कोण? पती की पालक; जाणून घ्या कायदा-
पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जुलै महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता. पुणे, मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला होता मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस सुरु आहे. तर काही जिल्ह्यांमधून पाऊस गायब झाला आहे.
पाकिस्तानातील हिंदू भारतातील हिंदूंपेक्षा अधिक आनंदी; राष्ट्रपती आसिफ अली झरदारींचे वक्तव्य चर्चेत-