Pune Rain Alert : पुणे, नागपूरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी
Pune Rain Alert : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
Pune Rain Alert : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता देखील मुंबई हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पुणेसह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे आज हवामान विभागाकडून 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज, सातारा, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे 5 ऑगस्ट रोजी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर 6 ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात 6 आणि 7 ऑगस्ट रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
4 August Horoscope : आज ‘विष योग’ तयार होणार ‘या’ 5 राशींना होणार फायदा-
विदर्भातील आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.