Download App

सारा तेंडुलकरच्या नावाने फेक अकाऊंट, असलीपेक्षा 1 लाख जास्त फॉलोअर्स

Sara Tendulkar : सध्या डीपफेकची (Deepfake) देशभरात चर्चा सुरु आहे. यात अनेकांच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. आता सोशल मीडियाच्या गैरवापराची शिकार सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकरही (Sara Tendulkar) झाली आहे. तिच्या नावाने एक्सवर (ट्विटर) बनावट अकाऊंट तयार करण्यात आले होते. याचा खुलासा साराने इंस्टग्राम अकाऊंटवरुन केला आहे.धक्कादायक बाब म्हणजे साराच्या रिअल एक्स अकाऊंटचे जवळपास 1.5 लाख फॉलोअर्स आहेत, तर फेक अकाउंटचे 2.6 लाख फॉलोअर्स आहेत.

इंस्टग्राम पोस्टमध्ये सारा म्हणाली की, तंत्रज्ञानाचा ज्याप्रकारे गैरवापर वाढत आहे, त्यामुळे भविष्यात लोकांसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. डीपफेक सत्यापासून कोसो दूर आहे. अशा प्रकारे कोणाच्याही फोटोशी छेडछाड करून लोक चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत.

साराने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली
सारा तेंडुलकरने तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. पण काही वेळेनंतर ती पोस्ट तिने का हटविली हे समजले नाही. त्या पोस्टमध्ये साराने सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पोस्ट टाकल्याबद्दल आणि तिच्या फोटोचा गैरवापर करण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

ASK SRK : ‘डंकी’च्या रिलीजपूर्वीच शाहरुख खानची मोठी घोषणा! हाऊसफूल…

Sara Tendulkar

सारा म्हणाली की, सोशल मीडियावर मनोरंजनापेक्षा सत्याची गरज आहे. माझ्या नावाने X वर एक फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. त्याचे हजारो फॉलोअर्सही आहेत. हे अकाऊंट चालवणारा युजर तिचा कथित बॉयफ्रेंड शुभमन गिलसोबत तिचे फोटो, व्हिडिओ आणि फोटोही शेअर करतो. यामुळे इंटरनेटवर अफवा पसरतात आणि लोकांची प्रतिमा खराब होते.
Deepfake : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला जगाला डीपफेकचा धोका, एकत्र येण्याचे आवाहन

सारा तेंडुलकर म्हणाली की, आपले सुख, दु:ख आणि दैनंदिन व्यवहार शेअर करण्यासाठी सोशल मीडिया हे आपल्या सर्वांसाठी एक चांगले व्यासपीठ आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा गैरवापर हा आता चिंतेचा विषय बनला आहे. खोट्या गोष्टी आपल्याला सत्यापासून दूर नेतात. माझे डीपफेक फोटोही शेअर केले गेले, जे वास्तवापासून दूर आहे. दिशाभूल करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जातात, ज्या अजिबात चांगल्या नाहीत.

Tags

follow us