Download App

Sharda Sinha Death : मोठी बातमी! प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे निधन

Sharda Sinha Death : प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे निधन झाले आहे. दिल्लीमधील एम्समध्ये त्यांचे निधन झाले. माहितीनुसार, शारदा सिन्हा

  • Written By: Last Updated:

Sharda Sinha Death : प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा (Sharda Sinha) यांचे निधन झाले आहे. दिल्लीमधील एम्समध्ये (AIIMS) त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलगा अंशुमन सिन्हा यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

यापूर्वी अंशुमन सिन्हा (Anshuman Sinha) यांनी फसेबूकवर पोस्ट करत शारदा सिन्हा यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत लिहिले होते की, शारदा सिन्हा यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी फसेबूकवर पोस्ट करत दिली होती.

2018 मध्ये गायिका शारदा सिन्हा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शारदा सिन्हा यांच्या छठ पूजेवर आधारित ‘हो दीनानाथ’ या गाण्याला लोकांनी भरभरून प्रेम दिले होते.

शारदा सिन्हा गेल्या काही दिवसांपासून एम्समध्ये दाखल होत्या. सोमवारी संध्याकाळी शारदा सिन्हा यांना खासगी वॉर्डातून आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शारदा सिन्हा यांची ऑक्सिजनची पातळी घसरली होती आणि त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. शारदा सिन्हा मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शनने त्रस्त होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शारदा सिन्हा यांचा मुलगा अंशुमन सिन्हा यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या आईची प्रकृती जाणून घेतली होती. पीएम मोदींनी अंशुमन सिन्हा यांना त्यांच्या आईवर अत्यंत ताकदीने उपचार करा, असे सांगितले होते. यासोबतच पंतप्रधानांनी अंशुमन सिन्हा यांना त्यांच्या आईच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

चला तर…, मुंब्रात शिवरायांचा मंदिर उभारु, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चॅलेंज

शारदा सिन्हा यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1952  रोजी सुपौल जिल्ह्यातील हुलसा या गावात झाला. बिहार कोकिला व्यतिरिक्त, अतुलनीय व्यक्तिमत्व शारदा सिन्हा यांना भोजपुरी कोकिला, भिखारी ठाकूर सन्मान, बिहार रत्न, मिथिली विभूती असे अनेक सन्मान मिळाले आहेत. शारदा सिन्हा यांनी भोजपुरी, मगही आणि मैथिली भाषांमध्ये लग्न आणि छठ गाणी गायली आहेत जी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

follow us