सत्तेत नसल्याने काँग्रेसची अवस्था तडपत्या माशासारखी; निकालानंतर PM नरेंद्र मोदींची टीका
Pm Narendra Modi : सत्तेत नसल्याने काँग्रेसची (Congress) अवस्था तडपत्या माशासारखी झाली असल्याची खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निकालानंतर केलीयं. दरम्यान, जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपने सत्ता कायम राखलीयं. त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून कोणत्याच राज्यात काँग्रेस पुन्हा सत्तेत आलेलं नाही. 2011 साली आसाममध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं होतं. त्यानंतर जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये दुसऱ्या टर्मला काँग्रेस सत्तेत आलेलं नाही. जनतेने काँग्रेससाठी नो एन्ट्रीचा बोर्ड लावला आहे. सत्तेत असताना काँग्रेसला वाटायचं की काम करो अथवा न करो लोकं मतदान करतात पण आता त्यांची पोलखोल झाली आहे. काँग्रेस सत्तेला जन्मसिद्ध हक्क मानत आहे, सत्तेत नसल्याने काँग्रेसची तडपत्या माशासारखी अवस्था झाली असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीयं.
तसेच हरियाणाच्या जनतेने पुन्हा एकदा कमाल केली आहे, हरियाणात कमळ कमळच केलंय. हरियाणात सलग तिसऱ्यांदा कमळ फुललंय, गीताच्या धर्तीवर सत्याचा विजय, गीताच्या धर्तीवर सुशासनाचा विजय प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी भाजपला मतदान केलंय. जम्मूमध्ये अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर शांततेत निवडणूक पार पडली, मतांची मोजणी झाली, जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणी झालीयं हा भारताच्या संविधानाचा लोकशाहीचा विजय झाला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय.
हरियाणासारखंच महाराष्ट्रात वनसाईड बहुमत मिळणार; नवनीत राणांना फुल कॉन्फिडन्स
जम्मू काश्मीरच्या लोकांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला अधिका जागा दिल्या आहेत, त्यांना शुभेच्छा. जम्मूमध्ये जेवढे पक्ष निवडणूक लढवत होते. त्यामध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना शुभेच्छाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.
काँग्रेस समाजात जातीयतेचं विष पसरवत आहे, जे लोकं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले ते लोकं पिढीजात चांगलं आयुष्य जगत आले ते गरीबांना जातीच्या आधारावर नरमनायला पाहत आहेत. दलित आदिवासींवर सर्वाधिक काँग्रेसने अत्याचार केलायं, त्यांना विकासापासून वंचित ठेवलं. सत्ता मिळाली तरीही काँग्रेसने दलित, आदिवासीला कधीच पंतप्रधान बनू दिलं नाही. काँग्रेसचा परिवार दलित आदिवसींचा धिक्कार करीत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीयं.
आज दलित आदिवासी मंदिरांमध्ये जात आहेत तर विरोधकांचं पोट दुखत आहे. काँग्रेसच्या शाही परिवाराने सांगितलं की ते आरक्षण संपवणार आहेत, हरयाणामध्ये ते हेच करायला निघाले होते. भारतात अराजकता पसरवून देशाला कमजोर करीत आहे, ते समाजांना भडकावत आहेत, शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला पण हरियाणाच्या शेतकऱ्यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.