जनतेला डबल इंजिन सरकार हवे, महाराष्ट्रात हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती होणार, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

जनतेला डबल इंजिन सरकार हवे, महाराष्ट्रात हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती होणार, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

Chandrashekhar Bawankule : हरियाणामध्ये भाजपने (BJP) ऐतिहासिक यश मिळवले असून हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होणार असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ते प्रदेश कार्यालयात बावनकुळे माध्यमांशी बोलत होते. तसेच लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करणारा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उघडा पडला, असेही बावनकुळे म्हणाले.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, हरियाणामध्ये भाजपाची सत्ता स्थापन होत आहे. जम्मू – काश्मीरमध्येही भाजपाला मोठे यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली होती. मात्र आता विरोधकांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे. मोदी सरकारच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देत जनतेने भरभरून भाजपाच्या पारड्यात मतदान केले म्हणून हरियाणा, जम्मू – काश्मीरमध्ये इतके मोठे यश मिळाले आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे अमेरिकेतील आरक्षणाबाबतचे वक्तव्य ऐकल्यानंतर काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला आहे.जीविताचे, मालमत्तेचे तसेच संविधानाचे रक्षण केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटणार आहेत. राज्याच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्रातील मतदारही महायुतीला विजय प्राप्त करून देतील.

विरोधकांचे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रामध्ये हाणून पाडण्यासाठी ‘भाजपा घर चलो अभियान’ राबविणार आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचून काँग्रेसने निर्माण केलेला संभ्रम दूर करून राज्य आणि केंद्र सरकारची विकासकार्ये पोहोचवेल. विरोधकांचे जातीपातीचे राजकारण हद्दपार करून सर्व समाजांना एकत्र ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहील.

हरियाणात पुन्हा भाजप तर जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘इंडिया’ आघाडी सरकार! 

आत्मपरिक्षणाची वेळ आता काँग्रेसवर आली आहे. भाजपाला विजयाचा उन्माद नाही की पराजयाने आम्ही खचत नाही. अंत्योदयाच्या भावनेने भाजपा सतत कार्य करत आहे असेही बावनकुळे यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube