आरक्षणाची मर्यादा हटवणार अन् जातीय जनगणना करणारच; राहुल गांधींची मोठी घोषणा
Rahul Gandhi on caste Census : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. त्यातच विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) आता अगदी तोंडावर आलेल्या असतांना हा मुद्दा आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. जातनिहाय जनगणना करणार (Caste Census) आणि आरक्षणाची (Reservation) 50 टक्कांची मर्यादा आम्ही हटवणारच, असं विधान त्यांनी केलं.
बिंग फुटलं! गावात सुरु केली SBI ची बोगस शाखा, अनेकांना लाखो रुपयांचा घातला गंडा
आज कोल्हापुर दौऱ्यावर असतांना राहुल गांधींनी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले की, राज्यसभा आणि लोकसभेत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार आणि जातनिहाय जनगणनेचा प्रस्ताव मंजूर करून घेणारच. मोदी असो की भापज कोणीही हे विधेयक रोखू शकणार नाही. या दोन गोष्टी केल्यावरच खरा न्याय मिळेल. जातनिहाय जनगणना सुरू झाली तर सर्व डेटा आपल्या हाती असेल, असं ते म्हणाले.
“अर्बन नक्षलच काँग्रेसला चालवतात, त्यांच्यापासून सावध राहा”, PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
पुढं बोलतांना ते म्हणाले, काँग्रेस आणि इंडिया आघाडी पहिल्यांदा आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा बदलणार. आम्ही अशीच आश्वासन देत नाही तर आम्ही जे बोलतो, ते करतोय. देशातली 90 टक्के समाजाची दयनीय अवस्था दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणना हा दुसरा क्रांतीकारी उपाय आहे. देशात किती ओबीसी आहेत, हे कोणालाच माहीत नाही. लीगली कुणाला माहिती नाही. जातीच्या जनगणनेनंतर अधिकृत माहिती उपलब्ध होईल, असं ते म्हणआले.
सोशो इकोनॉमिक सर्व्हे करणार…
दलितांच्या हातात किती पैसा आहे? आदिवासींच्या हातात किती पैसा आहे? ओबीसींच्या हातात किती पैसा? सोशो इकॉनॉमिक सर्व्हेतून भारताच्या विविध संस्थांमध्ये हा वर्ग किती आहे?याची माहिती मिळणार आहे. त्यामुळं आम्हाला सोशो इकोनॉमिक सर्व्हे करायचा आहे.
आम्ही जातनिहाय जनगणनेवर बोलतो तर भाजप आणि संघ विरोध करतो. जातीय जनगणना हा देशाचा एक्सरे आहे. एक्स रे काढला तर तुम्हाला अडचण काय? त्यांचा विरोध यासाठी आहे की, त्यांना सत्य लपवायचं. देशातील ९० टक्के जनतेला देशाची संपत्ती, सिस्टम कुणाच्या हातात आहे हे लोकांना कळू नये असं त्यांना वाटतं. पण, आम्हाला जातनिहाय जनगणना हवी आहे. हे विधेयक आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत पास करून दाखवणारच, असा निर्धार राहुल गांधींनाी केला.