Tyler Christopher Death: काही दिवसांपूर्वी प्रसिध्द अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन झालं आहे. पेरी यांच्या निधनाच्या हालिवूड सावरत नाही तोच आता आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. जनरल हॉस्पिटल आणि डेज ऑफ अवर लाइव्ह या लोकप्रिय शोसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता टायलर ख्रिस्टोफर (Tyler Christopher) याचे निधन झाले आहे. टायलरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. त्याच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा व्यक्त केली जात आहे.
वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी टायलरने अखेरचा श्वास घेतला. जनरल हॉस्पिटलचे सह-स्टार मॉरिस बेनार्ड यांनी टायलरच्या मृत्यूची पुष्टी केली.
इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून बेनार्ड यांनी टायलरच्या मृत्यूला दुजोरा दिला. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आम्ही टायलर ख्रिस्टोफर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खाने शेअर करत आहोत. आज सकाळी त्यांचे सॅन दिएगो अपार्टमेंटमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.’
आपल्या मित्राच्या मृत्यूच्या बातमीने अतिशय दु:ख झालेल्या बेनार्ड यांनी लिहिले, टायलर एक खरा प्रतिभावंत होता, त्याने प्रत्येक पात्रात जीव ओतून भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली. टायलर एक चांगला माणूस होता, त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी तो एक चांगला मित्र होता, असं त्यानी लिहिलं.
चाहत्यांकडून शोक व्यक्त
टायलर ख्रिस्टोफरच्या दु:खाची वार्ता चाहत्यांनी सजमल्यावर त्यांनीही शोक व्यक्त केला. मॉरिस यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका युजर्नने लिहिलं की, मी माझ्या मुलाचे नाव ख्रिस्टोफर टायलर ठेवले… मी अभिनेता ख्रिस्टोफर यांना कायम लक्षात ठेवेन. तर आणखी एकाने कमेंट केली. “अरे देवा! गेल्या 4 दिवसांत हा दुसरा धक्का आहे. ख्रिस्टोफर यांचे कुटुंबीय, मित्र यांना या धक्कातून सावरायला बळ मिळो.
जनरल हॉस्पिटलचे कार्यकारी निर्माते फ्रँक व्हॅलेंटिनी म्हणाले, टायलर क्रिस्टोफरच्या निधनाच्या बातमीने मी दु:खी झालो आहे. टायलर एक दयाळू, मेहनती अभिनेता आणि प्रिय मित्र होता. मी त्याच्या परिवाराच्या दु:खात सहभागी आहे.
Maratha Reservation : ‘…तर पाणीही बंद करणार’; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम!
टायलर ख्रिस्टोफरचा जन्म 11 नोव्हेंबर 1972 साली झाला. ख्रिस्तोफर 1996 ते 2016 दरम्यान जनरल हॉस्पिटलमधून लोकप्रिय झाला. यात त्याने निकोलस कॅसाडिनची भूमिका साकारली होती. यानंतर ‘डेज ऑफ अवर लाइव्हज फ्रॉम 2018 ते 2019’ या शोमध्ये स्टीफन डिमेराच्या भूमिकेने तो जगभरात प्रसिद्ध झाला. ख्रिस्तोफरने साकारलेल्या स्टीफन या भूमिकेने सर्वांची मनं जिंकली. क्रिस्टोफर त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला. ख्रिस्तोफरने 2002 मध्ये अॅलम इवा लॉन्गोरियाशी लग्न गेलं. मात्र, 2004 मध्ये दोन वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.