लोकप्रिय युट्यूबर कुशा कपिलाचा घटस्फोट; लग्नानंतर सहाच वर्षात झाले विभक्त

Kusha Kapila Divorce : लोकप्रिय युट्यूबर आणि अभिनेत्री कुशा कपिला (Kusha Kapila) आणि तिचा पती जोरावर सिंह अहलूवालिया (Zorawar Singh Ahluwalia) यांचा घटस्फोट (Divorce) झाला आहे. लग्नानंतर सहाच वर्षात हे दोघे विभक्त झाले आहेत. याबद्दल स्वतः कुशाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. तिच्या या पोस्टने तिचे चाहते आश्चर्य चकित झाले आहेत. तर […]

Untitled Design   2023 06 27T161027.872

Untitled Design 2023 06 27T161027.872

Kusha Kapila Divorce : लोकप्रिय युट्यूबर आणि अभिनेत्री कुशा कपिला (Kusha Kapila) आणि तिचा पती जोरावर सिंह अहलूवालिया (Zorawar Singh Ahluwalia) यांचा घटस्फोट (Divorce) झाला आहे. लग्नानंतर सहाच वर्षात हे दोघे विभक्त झाले आहेत. याबद्दल स्वतः कुशाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. तिच्या या पोस्टने तिचे चाहते आश्चर्य चकित झाले आहेत. तर तिने आपल्या पोस्टला कमेंट सेक्शन देखील बंद केले आहे. (Famous youtuber Kusha Kapila and husband Zorawar Singh Ahluwalia Divorced )

शिवसेना ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात…; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवे

काय आहे कुशा कपिलाची पोस्ट?

आपल्या घटस्फोटाबद्दल माहिती देणाऱ्या या पोस्टमध्ये कुशाने लिहिले की, जोरावर आणि मी आम्ही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हा निर्ण घेणं सोप नव्हतं. मात्र आम्हाला माहिती आहे. की, आमच्या जीवनाच्या या टप्प्यावर हा निर्णय योग्य आहे. आम्ही आता पर्यंतच्या आयुष्यात जे काही प्रेम आणि वेळ सोबत घालवला तो आमच्यासाठी मौल्यावान आहे. आम्ही हे नात वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र आता आणखी नाही करू शकत. आम्हाला वाईट वाटतय की, आम्ही वेगळे झालो आहोत.

पुढे कुशा असं देखील म्हणाली की, कोणतही नात संपुष्टात येणं हे अत्यंत दुखःद आहे. ही आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबांसाठी एक परीक्षा आहे. मात्र ही प्रक्रीया पार पाडण्यासाठी काही वेळ आहे. तसेच आम्ही आता पर्यंतच्या आयुष्यात जे काही प्रेम आणि वेळ सोबत घालवला तो एक दशकाचा काळ होता. तर आता आयुष्याच्या पुढील टप्प्यावर जाताना आम्हाला ह्या आठवणी विसरणं आणि ते भरून काढण्याची गरज आहे. ते देखील आम्ही एकमेकांना आदर, प्रेम आणि पाठिंबा देत पूर्ण करू.

मला बॅनरबाजीचा मुख्यमंत्री व्हायचं नाही, मुख्यमंत्रिपदाच्या बॅनरबाजीवर आठवलेंनी डिवचलं…

लोकप्रिय युट्यूबर आणि अभिनेत्री कुशा कपिला (Kusha Kapila) आणि तिचा पती जोरावर सिंह अहलूवालिया (Zorawar Singh Ahluwalia) यांनी 2017 मध्ये लग्न केले होते. तसेच कुशा कपिलाप्रमाणेच तिचा पती जोरावर सिंह अहलूवालिया देखील एक युट्यूबर आहे. 2012 मध्ये त्यांच्यात एका कॉमन मित्राच्या लग्नात ओळख झाली होती. हळूहळू त्यांची मैत्री झाली. नंतर प्रेम आणि लग्न. मात्र त्यांचं नात फार काळ टिकू शकलं नाही. दरम्यान कुशा बॉलिवूडमध्येही झळकू लागली आहे. ती अक्षय कुमार आणि रितेश देशमुखच्या ‘प्लान ए प्लान बी’ दिसली होती. अनेक शोमध्येही ती दिसली होती.

Exit mobile version