मला बॅनरबाजीचा मुख्यमंत्री व्हायचं नाही, बॅनरबाजीवर आठवलेंनी विरोधकांना डिवचलं…

मला बॅनरबाजीचा मुख्यमंत्री व्हायचं नाही, बॅनरबाजीवर आठवलेंनी विरोधकांना डिवचलं…

मला बॅनरबाजीचा मुख्यमंत्री व्हायचं नाही, भविष्यात मुख्यमंत्रिदाची संधी मिळाल्यास सर्वांसाठी चांगलं काम करणार असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना डिवचलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विरोधी नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा मजकूराचे बॅनर झळकले होते. त्यावर रामदास आठवलेंनी आपली भूमिका मांडली.

भारताला धडकी भरविणारा ‘राउंड रॉबिन फॉरमॅट’ आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

पुढे बोलताना आठवले म्हणाले, मला बॅनरबाजीचा मुख्यमंत्री व्हायचं नाही. मी माझ्या पक्षाचे एवढे आमदार निवडून आणू शकत नाही. जोपर्यंत मी माझ्या पक्षाचे ३०-४० आमदार निवडून आणत तोपर्यंत मी मुख्यमंत्री होऊ शकत नसल्याचं आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.

Diwali Holiday : भारतीयांसाठी आनंदाची बातमी! अमेरिकेतही मिळणार दिवाळीची सुट्टी

तसेच कारण नसताना मला भावी मुख्यमंत्री बॅनर लावायचे नाहीत. भविष्यात मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाल्यास सर्वच घटकांसाठी चांगलचं काम करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच मी संधी मिळाल्याशिवाय विनाकारण बॅनरबाजी करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सहाशे गाड्यांच्या ताब्यासह केसीआर सोलापूरकडे…. पाहा फोटो

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोध पक्षांच्या नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ टॅगलाईनचे बॅनर झळकल्याचं दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे बॅनर झळकले होते. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांचेही बॅनर झळकत आहेत.

एका कार्यक्रमात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे एका भावी मुख्यमंत्री म्हणून असे बॅनर झळकले होते. त्यावरुन विरोधकांनी अनेक टीका-टीपण्या केल्याचं दिसून आलं होतं. यावर आता रामदास आठवलेंनी आपल्या मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube