भारताला धडकी भरविणारा ‘राउंड रॉबिन फॉरमॅट’ आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 27T155826.493

ICC ODI World Cup Round-robin Format:  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 5 ऑक्टोबर रोजी या मेगा स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होतील. या स्पर्धेतील सर्व सामने राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवले जातील. यात सर्व संघांना एकूण 9 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार आहे. यापूर्वी, 1992 मध्ये प्रथमच या फॉरमॅटमध्ये विश्वचषकाचे सामने आयोजित करण्यात आले होते. तर दुसऱ्यांदा 2019 वनडे वर्ल्डकपमध्ये या फॉरमॅट अंतर्गत सामने खेळवण्यात आले होते. परंतु हा फॉरमॅट टीम इंडियाला धडकी भरवणारा आहे.

‘वानखेडे’चं महत्त्व संपलं?; IPLनंतर वर्ल्डकपचा अंतिम सामनाही गुजरातमध्ये!

याचे कारण राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिलेली नाही. 1992 मध्ये, जेव्हा प्रथमच या फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा खेळली गेली तेव्हा भारताला टॉप-4 मध्येही स्थान मिळवता आले नाही. दुसरीकडे, 2019 मध्ये, जेव्हा दुसऱ्यांदा राऊंड रॉबिन स्वरूपात एकदिवसीय विश्वचषक खेळला गेला, तेव्हा भारतीय संघाचा प्रवास सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने संपला. त्यामुळे यावेळेसदेखील भारताला अत्यंत सावधपणे पाऊले उचलावी लागणार असल्याचे क्रिकेट तज्ज्ञांनी म्हटले आहे.

आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्व 10 सहभागी संघांना राऊंड रॉबिन स्वरूपात एकमेकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. अशा स्थितीत सर्व संघ एकूण 9 सामने खेळतील. अशाप्रकारे, जे संघ अधिक सामने जिंकतील आणि टॉप-4 मध्ये आपले स्थान निर्माण करतील, ते थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

धर्मग्रंथांना तरी सोडा; सेन्सॉर बोर्ड काय करतं? न्यायालयाने आदिपुरुषच्या निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डलाही फटकारलं

 

यानंतर बाद फेरीचे सामने सुरू होतील. गुणतालिकेतील क्रमांक-1 संघाचा सामना क्रमांक-4 असेल, तर क्रमांक-2चा उपांत्य सामना क्रमांक-3 बरोबर होईल. विजयी संघ अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित करतील. या फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेमुळे सर्वच संघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. प्रत्येक सामना संघासाठी महत्त्वाचा असल्याने, टॉप-4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी देखील एक रोमांचक लढाई असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube