Download App

Fawad Khan: 8 वर्षांनंतर पाकिस्तानी अभिनेत्याचे पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन; ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

Fawad Khan Comeback: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे (Fawad Khan ) जगभरात फॅन फॉलोइंग आहेत.

Fawad Khan Comeback: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे (Fawad Khan ) जगभरात फॅन फॉलोइंग आहेत. जेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये (Bollywood) प्रवेश केला तेव्हा सर्वांनाच त्याचे वेड लागले होते. त्याचा खूबसूरत, कपूर अँड सन्स हा चित्रपटही खूप आवडला होता. फवादची फॅन फॉलोइंग भारतातही खूप मजबूत आहे. मात्र, 2016 मध्ये आलेल्या ‘ए दिल है मुश्कील’ चित्रपटानंतर फवाद कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसलेला नाही. उरी हल्ल्यानंतर (Uri attack) पाकिस्तानी (Pakistani) कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. आता 8 वर्षांनंतर फवाद बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.


2023 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) भारतीय नागरिक, कंपन्या आणि संस्थांना पाकिस्तानी कलाकार, जसे की अभिनेता, गायक, संगीतकार, गीतकार आणि तंत्रज्ञ यांच्याशी सहकार्य करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदौस पी पूनीवाला यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने घोषित केले की ही याचिका सांस्कृतिक सलोखा, एकता आणि शांतता यांना चालना देण्यासाठी एक प्रतिगामी पाऊल दर्शवते आणि गुणवत्तेचा अभाव आहे.

या अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, या बॉलिवूड चित्रपटात फवाद खान वाणी कपूरसोबत (Vaani Kapoor) रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये होणार आहे. शीर्षक अजून सांगितलेले नाही. हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे. त्याचे शूटिंगही लवकरच सुरू होणार असून त्यासंबंधीची माहितीही शेअर केली जाणार आहे.

Vaani Kapoor : वाणी कपूरला लॉटरी लागली! अजय देवगणसोबत करणार स्क्रीन शेअर, म्हणाली

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर फवाद लवकरच बरजाक या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सिरीजमध्ये त्याच्यासोबत सनम सईद मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. असो, चाहते फवादच्या चित्रपटांची आणि शोची आतुरतेने वाट पाहत असतात. आता बॉलीवूड चित्रपटाची माहिती मिळताच ते खूप उत्साहित होतील.

follow us

वेब स्टोरीज