Barzakh Trailer: भूत, प्रेम आणि सस्पेन्स! फवाद खान-सनम सईदच्या ‘बरजाख’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Barzakh Trailer: भूत, प्रेम आणि सस्पेन्स! फवाद खान-सनम सईदच्या ‘बरजाख’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Barzakh Trailer Released: जिंदगी गुलजार है फेम अभिनेते सनम सईद (Sanam Saeed) आणि फवाद खान (Fawad Khan) पुन्हा एकदा पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाले आहेत. दोघेही एका नव्या सिरीजमध्ये दिसणार आहेत. ‘बरजाख’ (Barzakh web series) असे या सिरीजचे नाव आहे. बरजाख सिरीजचा धमाकेदार ट्रेलरही (Barzakh Trailer) रिलीज झाला आहे. चाहत्यांना सिरीजचा ट्रेलर खूप आवडला आहे. फवाद खान (Fawad Khan) आणि सनम सईदला पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नाही.

ट्रेलर कसा आहे?

ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, ही कथा आहे एका 76 वर्षीय व्यक्तीची ज्याला लग्न करायचे आहे. तो आपल्या मुलांना आणि नातवंडांना दूरच्या ठिकाणी रिसॉर्टमध्ये आमंत्रित करतो. त्या वृद्धाला भूताशी लग्न करायचे आहे.

सिरीजची कथा ट्विस्ट आणि टर्नने भरलेली आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, एका मुलाने फवादला विचारले की आजोबांना भूताशी लग्न करण्यापासून कोणी का थांबवलं नाही? तर फवाद म्हणतो – घाबरा. फवादला असे वाटते की त्याचे वडील भूताशी लग्न करण्याचा चुकीचा निर्णय घेत आहेत. तर सनमला प्रेमाची ताकद वाटते आणि फवादला त्याच्या वडिलांसाठी आनंदी राहण्यास पटवून दिले.

या कथेत भावनांसोबतच खूप सस्पेन्सही आहे. या अलौकिक शोमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सस्पेन्स आणि प्रेम कसे एकत्र येतात हे पाहणे मजेदार ठरणार आहे.

Amrita Khanwilkar : अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक, चाहते घायाळ

या सिरीजचे दिग्दर्शन असीम अब्बासी यांनी केले आहे. ही सिरीज 19 जुलैपासून सुरू होईल आणि दर मंगळवार आणि शुक्रवारी जिंदगीच्या युट्युब चॅनेल आणि झी 5 वर प्रसारित होणार आहे. या सीरिजचे 6 भाग असणार आहेत. निर्मात्यांच्या मते, हा शो मानसिक आरोग्य, प्रसूतीनंतरचे नैराश्य, जनरेशनल ट्रॉमा यांसारख्या थीमवर आधारित असेल. सनम आणि फवाद व्यतिरिक्त या शोमध्ये सलमान शाहिद, इमान सुलेमान आणि फ्रँको ग्युस्टी सारखे स्टार्स देखील आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज