Salman Khan: भाईजानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T155112.080

Aishwarya Rai: बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांचे अफेअर्स हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. भाईजान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांचे खूप काळ अफेअर हे बॉलिवूडमधील गाजलेल्या प्रेमप्रकरणांपैकी एक प्रकरण आहे. संजय भन्साली यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam ) या सिनेमात भाईजान आणि ऐश्वर्याने पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यांची ऑन स्क्रीन जोडीही चाहत्यांच्या मोठ्या पसंतीस उतरली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)


‘हम दिल दे चुके सनम’च्या शूटिंगच्या दरम्यानच भाईजान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले होते. परंतु त्यांचे हे अफेअर जास्त काळ टिकले नाही. काही कारणास्तव भाईजान आणि ऐश्वर्या यांचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर बऱ्याच काळानंतर ऐश्वर्याने एका मुलाखतीत भाईजान बद्दलच्या रिलेशनशिपविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी तिने भाईजानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने भाईजान सोबत ब्रेकअपच्या चर्चांवर मौन सोडले होते. “ब्रेकअपनंतर भाईजान नेहमी तिला फोन करुन त्रास द्यायचा. तिचे इतर कलाकारासोबत अफेअर असल्याचा त्याला संशय असायचा असा मोठा गौप्यस्फोट तिने केला आहे. शाहरुख खानपासून ते अभिषेकपर्यंत सर्वांसोबत त्याने तिचे नाव जोडले असल्याचे यावेळी सांगितले आहे.

भाईजान मला मारल देखील होतं. माझं नशीब चांगलं, म्हणून माझ्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या इजा नाही झाल्या. काही झालं नाही, असं दाखवून मी शूटिंगसाठी जायचे. त्याने मला खूप त्रास दिला आहे. भाईजान सतत फोन लावायचा आणि न उचलल्यावर तो स्वत:ला दुखापत करुन घ्यायचा. २००१ साली त्याने दारू पिऊन माझ्या घराबाहेर मोठा तमाशा घातला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


माझ्या बाबांनी त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली होती,” असंही ऐश्वर्याने यावेळी सांगितले आहे. ऐश्वर्याच्या या आरोपांवर भाईजानने मिड डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. “मी तिला कधीही मारले नाही. मी जेव्हा भावनिक होतो, तेव्हा मी स्वत:चं नुकसान करुन घेतल आहे. भींतीवर डोकं आपटून मी स्वत:ला दुखापत केली आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

मी इतर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला दुखावू शकत नाही. मी फक्त सुभाष घई यांच्यावर हात उगारला होता. परंतु तेव्हा देखील मी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांची माफी मागितली होती, असं म्हणत भाईजान ऐश्वर्याच्या आरोपावर खुलासा केला होता.

Tags

follow us