Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी’, ‘आवारा पागल दीवाना’ (Awara Pagal Deewana) , ‘फिर हेरा फेरी’, ‘वेलकम’ आणि ‘आन’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे निर्माते फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) आणि इरोस मधला वाद मिटला असून माहितीनुसार नाडियाडवालाने ‘हेरा फेरी’ सह त्याच्या अनेक चित्रपटांचे राईट्स विकत घेतले आहे.
फिरोज नाडियादवाला यांच्या अनेक चित्रपटांनी कल्ट दर्जा प्राप्त केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सिक्वेल आणि नवीन भागाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. हीच मागणी ओळखून फिरोज नाडियाडवाला यांनी अक्षय कुमारसह वेलकम’ फ्रँचायझी ‘वेलकम टू द जंगल’ च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे.
येत्या काही दिवसात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोशल मीडिया ‘हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) ची मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे आता राईट्स विकत घेतल्यानंतर आणि स्क्रिप्ट फायनल झाल्यावर चित्रपट सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाडियाडवालाने इरोससह सुरू असणारा आर्थिक वाद मिठवल्यानंतर न्यायालयाकडून त्याला ‘हेरा फेरी’ आणि इतर चित्रपटांचे राईट्स घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे हेरा फेरी 3 चा मार्ग मोकळा झाला असून येत्या काही दिवसात या चित्रपटाची घोषणा होणार आहे.
ग्लोबल स्टार राम चरण बॉक्स ऑफिसवर करणार धमाका, गेम चेंजर संक्रांतीला प्रदर्शित होणार
तर दुसरीकडे हेरा फेरी 3 हा केवळ नाडियाडवालासाठी नाहीतर अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्यासाठीही एक दमदार प्रोजेक्ट सिद्ध होऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात फिरोज नाडियादवाला ‘हेरा फेरी’ टीमसोबत तिसऱ्या भागावर चर्चा करणार आहे.