काय रे तुम्ही वेड्याचा बाजार, तुम्हाला लाजा… प्लॅस्टीक पिशवी रस्त्यावर फेकताच अजित पवार कार्यकर्त्यांवर का भडकले?

Ajit Pawar Angry on Activist for Throw a plastic bag on street while Welcome to him : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. याची प्रचिती देखील वारंवार येताना दिसते. असंच त्यांनी यावेळी देखील बेशिस्त आणि हलगर्जीपणावरून कार्यकर्त्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी त्यांनी वर्धा दौऱ्यवर गेले होते. नियोजित वेळेच्या अर्धा तास पूर्वीच ते येथे दाखल होते. त्यामुळे त्यांचा सत्कार करायला काही कार्यकर्ते आले होते. या कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं होतं.
नेमकं काय झालं?
आज गुरूवारी 21 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते.येथे ते जिल्हाधिकारी कार्यालायात आढावा बैठकीसाठी जात असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत आणि आदरातिथ्य करण्याचं ठरवलं. त्यासाठी पुष्पगुच्छ आणण्यात आले होते. त्याच वेळी अजित पवार गाडीतून खाली उतरताच काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. मात्र लगेचच अजित पवारांनी पाया पडू नका आपल्याला पाया पडेललं आवडत नसल्याचं म्हणत ते टाळलं.
वराह जयंती 2025 : पौराणिक कथा, तारीख, महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, सगळं काही घ्या जाणून…
त्यानंतर लगेचच त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत असताना एकाने प्लॅस्टिक पिशवीतून पुष्पगुच्छ काढून ती पिशवी तेथेच फेकून दिली. त्यावरून अजित पवारांनी त्या कार्यकर्त्याला चांगलच फैलावर घेतलं. ते म्हणाले की, काय रे तुम्ही वेड्याचा बाजार घे ती प्लॅस्टिक पिशवी उचलून म्हणत अजित पवारांनी स्वत: ती पिशवी उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले की, तुम्हाला लाजा वाटत नाही का रे? घाण करता, शंभर वेळा सांगतो असा पिशव्या टाकू नका. लोकं शिव्या देतात. असं म्हणत अजित पवारांनी कचरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं.