वराह जयंती 2025 : पौराणिक कथा, तारीख, महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, सगळं काही घ्या जाणून…

Varah Jayanti 2025 Celebrated On 25 August : हिंदू (Hindu Dharma) पंचांगानुसार, भगवान विष्णूच्या तिसऱ्या अवतार वराह यांची जयंती (Varaha Jayanti 2025) भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी (Varah Jayanti) केली जाते. या वर्षी ही जयंती सोमवार, 25 ऑगस्ट 2025 रोजी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1:40 ते 4:15 असा आहे.
पौराणिक कथा
पुराणांमध्ये वर्णन आहे की, हिरण्याक्ष राक्षसाने पृथ्वी हिसकावून समुद्रात टाकली. जग विनाशाच्या संकटात होते, तेव्हा भगवान विष्णूने वराह रूप धारण करून समुद्राच्या तळाशी जाऊन पृथ्वी आपल्या दातांवर उचलली. त्यानंतर त्यांनी हिरण्याक्षाशी युद्ध करून त्याचा वध केला. पृथ्वीला तिच्या स्थानी सुरक्षितपणे परत आणले. त्यामुळे वराह जयंती धर्म, सत्य आणि पृथ्वी रक्षणाच्या विजयाचे प्रतीक मानली जाते.
भारत-रशियाची मोठी डील! ऊर्जा करारावर शिक्कामोर्तब, ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला चकवा?
वराह जयंतीचे महत्त्व
या दिवशी केलेल्या उपासनेने भक्तांना शत्रूंवर विजय, भयमुक्ती, आरोग्य, संपत्ती, धार्मिक प्रगती आणि इच्छापूर्ती मिळते. सत्याचे रक्षण आणि धर्माचा विजय याची आठवण करून देणारा हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पुण्यदायी मानला जातो.
पूजा विधी
– सकाळी शुद्ध स्नान करून घर किंवा मंदिराचे स्थान स्वच्छ करा.
-वराह अवताराची मूर्ती किंवा चित्र पंचामृताने (दूध, दही, मध, तूप, साखर) अभिषेक करा.
– फुले, फळे, धूप आणि दीप अर्पण करा.
– कलश पूजन करा – पितळाचा कलश घ्या, त्यात पाणी भरा, आंब्याची पाने आणि नारळ ठेवा, आणि पूजनानंतर ब्राह्मणाला दान करा.
– श्रीमद्भगवद्गीता, वराह स्तोत्र, विष्णु सहस्रनाम यांचे पठण करा.
– भजन-कीर्तन, आरती आणि कथा ऐकणे/सांगणे पुण्यदायी ठरते.
15 ऑगस्टचा विक्रम मोडला पण अखेर 20 ऑगस्टला भंडारदरा धरण ओव्हर-फ्लो…
दान आणि उपवास
उपवास करणाऱ्यांनी आदल्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न, कपडे, पैसे किंवा इतर वस्तू दान कराव्यात. उपवास पूर्ण किंवा अंशतः ठेवता येतो, आणि दिवसाच्या शेवटी फळे किंवा दही-फळ खाऊन उपवास सोडता येतो.
काय करावे आणि काय टाळावे?
– पूजा करताना वाद, राग किंवा अस्वच्छता टाळावी.
– उपवासाच्या काळात मांसाहार, मद्यपान आणि अशुद्धता टाळावी.
– सतत श्रद्धा ठेवून कथा वाचन, स्तोत्र म्हणणे आणि उपासनेत विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
वराह जयंती केवळ पूजा करण्याचा दिवस नाही, तर धर्म आणि सत्याच्या विजयाची आठवण देणारा आध्यात्मिक संदेश देखील आहे. भक्तीपूर्वक केलेली उपासना जीवनात शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती देणारी मानली जाते.
टीप – सदर लेख केवळ माहितीसाठी आहे. आम्ही याची कोणतीही पुष्टी करत नाही.