Download App

Fighter First Look: हृतिक रोशनच्या ‘फायटर’चा फर्स्ट लूक आऊट!

Fighter First Look Release OUT: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) सर्वात मोठा एरियल अॅक्शन चित्रपट ‘फाइटर’ची (Fighter Movie) जोरदार चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता ‘फाइटर’ चित्रपटातील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक (Fighter First Look) समोर आला आहे. हे पाहून चाहते चांगलेच आकर्षित झाले आहेत. त्याच्या लुकसोबतच त्याची व्यक्तिरेखा देखील समोर आली आहे.


चित्रपटात हृतिक स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जो त्याच्या कॉल साइन ‘पैटी’या नावाने ओळखला जातो. हे पोस्टर शेअर करताना पैटी उर्फ ​​स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया, कॉल साइन: पॅटी, पद: स्क्वाड्रन, पायलट, युनिट: एअर ड्रॅगन, फायटर फॉरएव्हर…” या सिनेमाच्या माध्यमातून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यांची जोडी पाहण्यासाठी चाहते देखील आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. सिद्धार्थचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी वॉर, बँग बँग या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

हृतिकच्या पोस्टवर चाहते आणि यूजर्सच्या कमेंट्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव होत आहे. सुरुवातीला, सुपरस्टारच्या चाहत्यांनी त्याच्या फर्स्ट लूकला पसंती दर्शवली. मात्र त्यानंतर असे काही यूजर्स आले, ज्यांनी त्याची तुलना ‘टॉप गन’शी केली. एका यूजरने लिहिले, ‘टॉप गनची कॉपी. बॉलिवूडची तीच जुनी सवय. दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, ‘फर्स्ट लूक ठीक आहे, संपूर्ण सिनेमाला टॉप गनची कॉपी बनवू नका.’

Songya Trailer: ‘एका लढवय्या मुलीची कहाणी’; सोंग्या सिनेमाचा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज

या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अशी त्यांची जोडी पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या एरियल अॅक्शन चित्रपटात अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘वॉर’, ‘बँग बँग’मध्ये एकत्र काम केले आहे. तुम्हाला सांगतो की ‘फाइटर’ पुढच्या वर्षी 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज